Dictionaries | References

अडवा

   
Script: Devanagari
See also:  अड , अडवें

अडवा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
aḍavā n A winding road, esp. over a hill.
अ0 जाणें To fall athwart one's way; to cross one's path. अ0 येणें To meet, encounter, come in one's way. 2 To oppose. 3 To go out to meet and receive. अ0 लावणें To find fault with. अ0 होणें To recline or lie down. अडवे घेणें To raise perverse objections and difficulties. अडवे नेसणें or लावून घेणें To dress sluttishly or slovenly;--used of females. Also अ0 नेसणें or घेणें See explained under उभा. अडवे येणें To fall athwart;--used of the fœtus at its birth. Pr. अडवे आलें असतां कापून काढावें.

अडवा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Cross. Adverse. Contrary. Broad.
अडवें आलें असतां कापून काढावें   Even one's babe if it threatens to cause death of the mother in parturition has to be cut up. Necessity knows no law or to get over the difficulty is itself the law.
अडवें नेसणें   To dress sluttishly-used of females.
अडवें येणें   Fall athwart one's way. Used of a fœtus at its birth.
अडवें लावणें   To find fault with.

अडवा     

वि.  रूंद , लठठ ;
वि.  तिरपा , वाकडा ;
वि.  उलटा , प्रतिकूल , विरुद्धा .

अडवा     

वि.  
उभा नव्हे तो ; तिर्यग ; क्षितिजसमांतर पातळींतील .
रुंद ( उभा = लांब याच्या उलट ). तो अंगानें अडवा आहे .
तिरपा ; वांकडा ; आड .
विरुध्द ; प्रतिकूल ; उलटा ; नुकसानकारक असा . त्याचें दैव अडवें आलें .
प्रतिबंध करणारा . - क्रिवि . बाजूनें ; बाजूवर ; सामोरा .
०करणें   आड आणणें ; करणें .
०ठाकणें   मध्यें येणें ; अडथळा करणें .
०येणें   
गांठणें ; भेटणें ; मार्गांत येणें .
विरुध्द जाणें ; नाउमेद करणें . प्रतिबध करणें . हा आडवा येईल कोण पाहो । - सारु ८ . २९ .
( विप्र . अडवें येणें ) गर्भांतील मुलानें सरळ न येतां प्रसूतिद्वाराशीं वांकडे होणें ; अडून रहाणें . म्ह० ( ल . ) आडवें आलें असतां कापून काढावें = मार्गांत कोणी जबर दस्त अडथळा आणला तर त्याचा प्रथम नाश केलाच पाहिजे . लोक म्हणती आडवें आलें । खांडून काढा ॥ - दा ३ . १ . ४० .
सामोरें जाणें ; स्वागत करणें .
०घेणें   १ दौषैकदृष्टीनें पाहणें ; वांकडें घेणें ; शंका घेणें .
खरडपट्टी काढणें ( विप्र . ) आडवातिडवा घेणें .
मुलाला पाजणें .
०जाणें   
रस्ता ओलांडून जाणें .
सामोरें जाणें .
हरकत करणें .
०टाकणें   ओलांडणें . त्याचें घर आडवें टाकून जा .
०झेलणें   झोकणें टाकणें देणें ,- धोंडा , गोळा , वीट , घागर इ० वस्तू एका रांगेनें उभे राहिलेल्या लोकांच्या हातांतून एकाकडून दुसर्‍याकडे अशा देणें , नेणें . ( अडवें ) नेसणें लावून घेणें - ( बायकी ) लहान वस्त्र , तात्पुरतें ( स्नान किंवा वस्त्रांतर करतांना ) गुंडाळणें , वेढून घेणें ; उभें घेणें .
०पडणें   
भांडणतंटा तोडण्यास मध्यें पडणें ; तडजोड करुं पहाणें .
लोटांगण घालणें ; दयेची याचना करणें ; उद्दिष्ट कार्य थांबविण्याविषयीं विनंति करणें .
विघ - विरोध करणें .
०बोलणें   
मुद्दा सोडून बोलणें .
वांकडे बोलणें ; लावून बोलणें ; विरुध्द बोलणें . म्हणोनि घडलें बोलणें आडवें ॥ - दावि १३५ .
०लावणें   
परत पाठविणें .
वस्त्रांतर करतांना किंवा स्नान करतांना आंखुड वस्त्र नेसणें ; वस्त्र अपुरें व सैल नेसणें ; उभें - आडवें नेसणें .
वांकडा अर्थ घेणें ; बोल लावणें ; निर्भत्सना करणें ; अडथळे उपस्थित करणें .
०होणें   
( जमीनीवर ) आंग टाकून लोळणें - निजणें ; कलंडणें .
( ल . ) खालीं पडणें ;
लठ्ठ होणें .
आड येणें ; मध्यें येणें . अडव्या अंगाचा , अडव्या काठीचा , अडव्या बांध्याचा , अडव्या हाडाचा -
लठ्ठ .
उंचीपेक्षां जास्त रुंद ; आडवा वाढलेला . अडव्या जिभेचा - वांकडेंतिकडें बोलणारा ; दुर्भाषण करणारा ; भांडखोर . अडव्या सुडक्याची बायको , अडव्या सुडक्याची रांड - अत्यंत दीन , दुर्बल ( विधवेबद्दल किंवा एकाद्या बाईबद्दल बोलतांना ग्राम्य शिवी ). तूं लहान झालास तरी पुरुष आणि मी मोठी झाल्यें तरी अ० बायको , माझे हातून काय दरबारांत बोलवेल ? अडव्या हातानें देणें , अडव्या हातीं देणें - लांच देणें . अडव्या हातानें घेणें - ( ना . ) खरडपट्टी काढणें . अडव्यांत शिरणें -
वाम मार्गाचा अवलंब करणें ; सरळ रस्ता सोडून जाणें .
वांकडें बोलणें ; विषयांतर करणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP