Dictionaries | References अ अनुकूळ Script: Devanagari See also: अनुकूल Meaning Related Words अनुकूळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. फायदेशीर ; उपकारी ; सहाय्यक ; धार्जिणा ; शुभ ; कल्याणप्रद ; हितकर ; हितावह ; योग्य ; मनाच्या आवडीप्रमाणें असलेला . पूर्वेकडे गमनास पश्चिमवायु अनुकूल होतो .जुळणारा ; जमणारा ; संमत ; अनुसरुन असणारा . मीमांसामत धर्मशास्त्रास अनुकूल आहे .तयार ; हातांत , ताब्यांत , हुकमतींत असणारा . ( पैसे , धान्य वगैरे ). अनुकूल स्त्रियापुत्र । अ० मंत्री पवित्र । अ० राज्य सर्वत्र । भोगिले विचित्र नानाभोग ॥ - एभा २ . १४३ . - न . योग्य परिस्थिति ; सहाय्यक परिस्थिति ; अनुकूलता ; सोईस्करपणा . ( प्रतिकूल याच्या उलट ). यंदा काशीस जाण्याचें आम्हांस अनुकूल नाहीं ; सारीं माणसें घरीं दुखणाईत आहेत . [ सं . ] - ता - स्त्री .ऐपत ; सामर्थ .संमति . [ सं . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP