|
वि. असंथ ; अस्थिर . जैसें वाहतें पाणी जाय वेगें । तैसेंचि आणिक मिळे मागें । तेवीं असंतचि असिजे जगें । मानिजे संत - ज्ञा १५ . १३३ . वि. वि. बरेवाईट ; सत्यमिथ्या ; खरें खोटें . संत असंत कर्मे अर्जुनी । - विपू ६ . ३ . ऐसेनि संतासंतें । कर्मे प्रवृत्तिस्तव होतें । - ज्ञा १३ . ९७५ . शिष्य पाहिजे संतासंत । विचार घेता । - दा ५ . ३ . २७ . संतकी - स्त्री . साधुत्व ; साधुपणा . संतचार - पु . संताचा आचार , वागणूक ; संतपणा . वेदशास्त्र संतचार कल्पना घेती साधुजन । - ऐपो ३८९ . संतडा - पु . ( तिरस्कारवाचक ) संत . संतमंडळी - स्त्री . वारकरी पंथ ; विष्णुदास . संतमार्ग - पु . सज्जनांचा आचारक्रम , वागणूक , साधु लोकांची रीत , पद्धति मार्ग . संतमाळिका - स्त्री . गुरुशिष्यपरंपरेनें चालत आलेल्या साधुपुरुषाची परंपरा ; संताचा संघ ; संताची वंशावळ . संतसज्जन - पु . अव . ( व्यापक अर्थानें ) साधुपुरुष ; सदगुणी लोक ; पुण्यपुरुष ; साधुमंडळी . संतावलि - स्त्री . साधुसंतांच्या नांवांची पद्यमय यादी ; साधुसंतांची नांवे असलेले काव्य . [ सं . ] संती - वि . संतासंबंधी ; साधुविषयक ( रीति , वेष , पोशाख , राहणी वगैरे ). अविद्यमान ; खोटी . असत पहा . म्हणोनि हें असंतचि सरें । - परमा १० . २४ . लबाड ; नास्तिक ; संत नव्हे तो . ०पण ता - नस्त्री . नास्तिकपणा ; असाधुवृत्ति . ज्याचेनि वाक्यें असंतता । नि : शेष मावळे तत्त्वता । त्यासीचि गा सदगुरुता । वेदशास्त्रार्था प्रतिपाद्य ॥ - एभा ३ . २८७ . असत्कर्म ; मिथ्यात्व ; खोटेपणा . तैसे एकचि गुणेवीण । संतचि परि असंतपण । - ज्ञा १७ . ३९० . [ अ + सत - संत ]
|