Dictionaries | References आ आधणांतले रडतात व सुपांतले हांसतात Script: Devanagari Meaning Related Words आधणांतले रडतात व सुपांतले हांसतात मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 भाताकरितां ओयरावयास घेतलेल्या तांदुळांपैकी प्रथम जे आधणांत पडतात त्यांचेकडे पाहून बाकीचे सुपातील तांदूळ त्यांच्या विवळण्यापासून हसू लागले तर ते ठीक नव्हे. कारण लवकरच सुपातील तांदूळहि आधाणांत पडावयाचे असतात व त्यांनाहि तीच दशा प्राप्त व्हावयाची असते. तेव्हां एकाच परिस्थितीतील लोकांपैकी एखादा मनुष्य संकटांत सापडला म्हणजे त्यासंकटाबाहेर असणार्या माणसानें त्याची चेष्टा करणे चांगले नाही. कारण त्याचीहि वेळ लवकरच यावयाची असते. तेव्हां त्याची हेटाळणी न करतां त्यास सहानुभूति दाखविणे हे योग्य. आज जे सुखांत आहेत त्यांना दुसर्याच्या दुःखाची कल्पना येत नाही. पण भविष्यकाळी त्यांच्यावरहि दुःखाचा प्रसंग येण्याचा संभव असतो, ही त्यांस कल्पना नसते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP