Dictionaries | References

उभी

   
Script: Devanagari

उभी

   उभा पहा .
०कुडी  स्त्री. उंच , सडपातळ बांधा ; उभी ठेवण . ही गाय उभ्याकुडीची आहे . [ उभा ]
०चाकरी  स्त्री. त्रासदायक , जिकिरीची चाकरी , सेवा .
०चतुर्थी, चौथ स्त्री .   वद्यपक्षांतील चतुर्थी ; संकष्ट चतुर्थी . या दिवशीं सकाळपासून चंद्र उगवेपर्यंत उभें राहण्याचें कांहींचें व्रत असतें . [ उभी + चतुर्थी , चौथ ]
०दुपार  स्त्री. भर दोन प्रहर ; ऐन दुपारची वेळ ; ऐन माध्यान्ह .
०धांव  स्त्री. सरळ , वर , डोंगरावर चढणें . उभी धांव घ्यावी गिरी तो चढावा . - दावि १४५ .
०पेठ  स्त्री. या टोंकापासून त्या टोंकापर्यंतचे सर्व शहर , बाजार ; उभा बाजार पहा .
०रास  स्त्री. 
  1. मोज - मापकरितां , न विभागतां जशीच्या तशीच ठेवलेली धान्याची रास ; शेतांतून आणलेलें धान्य प्रथम नुसतें ढीग करुन ठेविलेलें असतें त्यास म्हणतात .
  2. ( ल . ) सर्व मालमत्ता ; कुटुंबाची अविभक्तमोल न केलेली मालमत्ता , संपत्ति , जिंदगी

अजमास उभी रास , गल्ला   पिकाचा किंवा धान्याचा अंदाज .
०विळी  स्त्री. ज्या विळीचें पातें मोडतां येत नाहीं किंवा मिटतां येत नाहीं अशी विळी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP