|
स्त्रीपु . काढून टाकणें ; बाहेर काढणें उपसणी , उपसा . ( होडींतील , डबक्यांतील पाणी , भांड्यांतील दूध , तूप , तेल वगैरे ). कोरडें , रिकामें करणें ( बालडी , चमचा , पळी , टोपली , हात वगैरेच्या साहाय्यानें ). बाहेर काढणें , वर काढणें ; मोकळे करणें ; उघडें करणें . ( म्यानांतून तरवार , गवसणींतून , आच्छादनांतून वस्तु वगैरे ). [ सं . उत + सृप ] वाक्प्रचार - १ अंगावर उपसणें = रागावून टाकून बोलणें , धावून जाणें . काम - धंदा उसपणें = काम धंदा उरकणें , पार पडणें , संपविणें . शिंग उसपणें = शिंगें उगारणें , शिंगें उगारुन मारावयास धावणें .
|