-
पु. १ शिंपा , कालवे , चुनखडीचे दगड भाजून व विरवून त्यांचें केलेलें चूर्ण . चुना बांधकामाला वापरतात . सुरती , परखांडी इ० याच्या जाती आहेत . २ ( ल . ) विध्वंस ; निर्दलन . [ सं . चूर्ण = चुना ; प्रा . चुण्ण ; हिं . चूना ; गु . चुनो ] ( वाप्र . )
-
०करणें ( ल . ) एखाद्या पदार्थाचा मारून , खाऊन सत्यानास , विध्वंस करणें . ( प्रतिपक्षीयाच्या ) नाकास चुना लावणें - आपल्या कार्याला आड येणार्या माणसाचें कांहीं चालू न देतां आपलें कार्य साधणें .
-
०होणें ( ल . ) नाश होणें ; खराबी होणें केळीच्या पानांचा सडून चुना झाला . सामाशब्द - चुनळ , चुनाळ , चुनाळें - न . विडयाच्या पानास लावण्याचा चुना ठेवण्याच लहानसें पात्र , डबी . [ सं . चूर्ण + आलय ] चुनेखाण - स्त्री . चुन्याची खाण ; चुनखाण ; चुनखडीच्या दगडांची खाण . [ चुना + खाण ] चुनेगच्ची - स्त्री . १ चुन्यानें बांधलेली आगाशी . २ ( ल . ) नुसती तंबाखूल चुना लावून खाणें यासहि चुनेगच्ची म्हणतात . - वि . चुन्यांचा गिलावा करून बांधलेले . [ चुना + गच्ची ] चुनेरी - वि . चुन्याचें बनलेलें . यांचें कवच चुनेरी पत्र्यांचें बनलेलें असतें . - प्राणिमो ८ . [ चुना ] चनोटा , चुनोटी - पुस्त्री . चुनाळें . [ सं . चूर्ण . वती ; हिं . चुनौटी ] चुन्याचा गिलावा - पु . घराच्या भिंती इ० कांच्या पृष्ठभागावर चढविलेला चुन्याचा जाड थर . चुन्याचा घाणा - पु . चुना बारीक करण्याची , चुना , रेती इ० एकत्र करून बारीक करण्याची घाणी . चुन्याची निवळी - स्त्री . चुनवणी ; विरविलेला चुना तळाशीं बसल्यावर वर राहिलेलें पाणी ; ( इं . ) लाइम वॉटर . चुन्याच्या कळया - स्त्रीअव . भाजलेले चुनखडीचे दगड .
-
चुना करणें
Site Search
Input language: