|
पु. गुरांना होणारी खरूज , खवडे . ( कथील (?)) स्त्री. ( ना .) महालक्ष्मीच्या सणाच्या दिवशीं पडवळ घालून केलेली कढी . हा शब्द यांच दिवशीं उप . योगांत आणिला जातो . ( सं . कथ् = काढणें ) स्त्री. १ कथलांचें भांडें ; कथलें . २ कथलांच्या तपेल्याच्या आकाराचें पात्र . - वि . कथिलासंबंधी ; कथलांचें ( भांडें वगैरे ). ( कथील ) एक प्रकारचा डिंक . - मुंव्या ४६ . स्त्री. एक तृणधान्य . कथली खरूज - १ स्त्री . जींतून पू वहात आहे अशी - ओली असलेली खरूज . २ ( ल .) अति द्वाड ; खोडकर मनुष्य . ३ काळजास जाऊन झोंबणारें दुःख , पीडा ; त्रासदायक गोष्ट . कथली व्याध - धी - पीडा - स्त्री . १ वहात असलेली गर्मी , उपदंश , बद ; २ ( ल .) खोडकर , त्रासदायक मनुष्य ; मरी , प्लेग , वाखा वगैरे आजार ; सांथ ; व्याधि ; पीडा .
|