Dictionaries | References

कमाल

   
Script: Devanagari

कमाल     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : चमत्कार

कमाल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
collectively. कमाल इनाम-दर-मोजणी-वसूल-ठिकेबंदी- आकार-लावणी-वहीत-पडीत-गायरान-हडोळा -&c. The original Ináms collectively, the original or full assessment, survey, revenue &c. For कमाल in these compounds कमाली is sometimes used. 2 By persons conversant with Muhammadans कमाल, meaning Perfectness or fullness, is used without restriction: as कमाल दौलत-नसीब-कृपा-मेहरबानी- पीक-भरणा-भरती-पूर-सस्ताई-लढाई-थंडी-ऊन्ह &c.: also without composition, as जरीमरीचें क0, दरिद्राचें क0.

कमाल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  The highest or maximum revenue assessed on land. Perfectness.

कमाल     

ना.  उच्चांक , पराकोटी , पराकाष्टा , पूर्णता .

कमाल     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : सर्वाधिक

कमाल     

 स्त्री. १ आत्यंतिकता ; पूर्णता ; पराकाष्ठा ; सर्वोत उच्च मर्यादा . २ ( एखाद्या खेड्याचा किंवा प्रदेशाचा ) जास्तीत जास्त सरकारी वसूल हा लागवडीच्या जमिनीवर आकारलेला नसून एकूणएक जमीन जमा धरून ती पेरली असतां तींत येणार्‍या अति ; उत्कृष्ट पिकाचा अंदाज करुन त्या प्रमाणांत बसविलेला असतो . कुलजमा ; वसूल . ' सार्‍या प्रांतांत कमाल जमेवर रयत निस्वत दर सद्दे दहा रुपये .' - खरे ५ . २४७१ . - वि . आत्यंतिक मार्यादेचा ; पराकाष्ठेचा ; पूर्ण ; अतिशय . ' त्याजवरी दिवसें दिवस कमाल मेहेरबानगी .' - चित्रगुप्त १११ . ' ना . शार्प यांचा कमाल अंदाज खरा धरला तरी फारतर तीस लक्ष रुपये होईल .' - केले १ . १३० . ( इं .) ( अर . कमाल = पूर्ण , पूर्णता )
०करणें   कल्पनातीत वागणें , पराकोटीला जाणें . ' कमाल केलीस बुवा !' ' जेथें शुरपणा अनंत समरीं शत्रुप्रती दीपवी । तेथें भीरुपणा कमाल करुनी देशास ह्मा लाजवी । ' - भांडाअ ३०३ .
०होणें   कळस होणें ; हद्द होणें ; पराकाष्ठेप्रत पोंचणें .' आतां मात्र कमाल झाली म्हणावची !' -( फाटक ) नाट्यछटा १ . - पु . कमाल या शब्दाचा मूळ अरबी अर्थ पुर्णता , संपुर्णपणा , हा जमांबंदीच्या कामांत अनेक सामासिक शब्दांत येतो . जसें ;-
०पत्रक   झाडा - नपु . तनखा , रनबा , कूळ , इनाम मोजणी , वसुल दर वगैरेंच्या एकुणात रकमांच्या तपशिलाचा पट .
०तनखा   कमाल अर्थ २ पहा . ' मराठेशाहींत दर गांवाहून जास्तींत जास्त जो वसुल आला , त्याचा दाखला काढून तोच गांवाच्या तनख्याऐवजीं कायदा केला .; - गांगा ११ .
०रगबा   तालुका किंवा खेडेगांव यांतील एकंदर जमीन .
०धारा   अधिकतम , जास्तींत जास्त येणें शक्य असलेला सारा . हा इ . स . १७६९ त ठरला गेला . सामशब्द
०इनाम   दर मोजणी वसूल ठिकेबंदी आकार लावणी वहीत पडीत गायरान हडोळा - पूर्वीची एकंदर सर्व इनामें , मुळचा किंवा एकंदर सारा , मोजणी , वसूल इ . या समासांत कमाल या शब्दाचें जागीं कमाली असाहि शब्द योजतात . मुसलमानंशी संघटण असलेल्या लोकांच्या तोंडीं कमाल शब्द पूर्णत्व किंवा अतिशय या अर्थानेंच परंतु अनिर्बंध रीतीनें येतो . जसें ;- कमालदौलत - नशीब - कृपा - पीक - भरणा - पूर - सस्ताई - लढाई - थंडी - ऊन वगैरे . शिवाय स्वतंत्र रीतीनेंहि जसें - जरीमरीचें कमाल , दारिद्राचें कमाल इ .

कमाल     

कमाल करणें
पराकोटीला जाणें
सीमा गाठणें
कल्‍पनातीत वागणें
कोणत्‍याहि गोष्‍टीची अंतिम मर्यादा गाठणें. ‘जेथे शूरपणा अनत समरी शत्रुप्रती दीपवी। तेथे भीरुपणा कमाल करुनी देशास या लाजवी।’ -भांडाअ ३०३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP