Dictionaries | References

करकरीत

   
Script: Devanagari

करकरीत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Brand new; spick and span new; crackling and rustling from newness--a garment, a pair of shoes &c. Applied sometimes to houses, trinkets, vessels. Gen. used after such words as नवा, कोरा, ताजा, and thus it may be viewed as mainly an adjunct of enhancement. Ex. नवा क0, कोरा क0. 2 Hard and crackling-- cucumbers, pickles &c. क0 तिनीसांजा f pl The very height of evening twilight. This is an inauspicious juncture.

करकरीत

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Brand new. Hard and crackling.

करकरीत

 वि.  अगदी नवा , कोरा , घडी न मोडलेला .

करकरीत

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : कडक

करकरीत

 वि.  १ अगदी नवा ; कोरा ; ऐन नवा ; नवेपणामुळें कडकड . खडखड सळसळ , आवाज करणारा ( नवा जोडा . कापड वगैरे केव्हां केव्हां घर , भंडे दागिने यांनांहि लावतात ). २ सामान्यत ; करकरीत हा शब्द नवा . ताजा , कोरा या शब्दापुढें आधिक्य जोर दाखविण्यासाठीं लावतात . जसं ; - नवा करकरीत , कोरा करकरीत . ३ कुरकुरीत ; खातांना ज्याचा करकर आवाज निघतो असा ( पदार्थ , काकडी , आंब्याचें नवें लोणचें ). ( ध्व .)
 वि.  कच्चा ; हिरवा . एकें हिरवी करकरितें । येकें बहुबीजें बुचबुचितें । ' - भारा . किकां १५ . ९१ . ( ध्व .)
०तिनीसांजा  स्त्री. अव . फुटकी सांज ; ऐन संध्याकाळ ; सुर्य मावळल्यानंतरचा संधिप्रकाश ( हि वेळ अशुभ मानतात ). ' वेळ करकरीत तिन्ही सांजाची होती ' - अभा ६३ .

करकरीत

   करकरीत तिनिसांजा
   सूर्य माळवल्‍यानंतर अंधार पडतो या दरम्‍यानचा संधिप्रकाश काल
   फुटक्‍यातिनिसांजा. ही वेळ सामान्यतः बाहेर जाण्यास अशुभ मानतात. ‘वेळ करकरीत तिनिसांजाची होती.’ -अस्‍तंभा ६३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP