Dictionaries | References

कर्तमकर्ता

   
Script: Devanagari
See also:  कर्तुमकर्ता

कर्तमकर्ता

   विपु . कुशल ; दक्ष ; निपूण , शिताफीनें काम चालविणारा , आवरणारा ; हुषार कार्यक्षम चालक म्ह० कर्तुमकर्तुमन्यथा कर्तु समर्थ ( हि संकृत म्हण आहे .)= ज्याच्या शक्ती अमर्याद आणि अप्रतिबद्ध आहेत अशा पुरुषासंबंधानें योजतात . जो नवीन करण्याला , असलेलें मोडण्याला किंवा वाटेल तसें फिरविण्याला अमर्थ आहे असा ( परमेश्वर , साधु , ऋषि , राजा , अधिकारी वगैरे ) ' किंवा म्हणसि समर्थ हें कर्तुमकर्तुमन्यथा कर्तुं । '- मोसंशयत्‍नमाला २४ . ( नवनीत पृ . ३५१ ), ' आज मराठेसाहींत कर्तुमकर्तुमन्यथा कर्तु शक्ति जर कोनाची असेल तर ती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या दोघांचीच होय .' =- स्वप २१० ( सं . कर्तुं + अकर्तुं + अन्यथा + कर्तुं )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP