Dictionaries | References

कल्हय

   
Script: Devanagari
See also:  कल्हई , कल्हे , कल्हेगर , कल्हेगार

कल्हय     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : मुलामा

कल्हय     

 स्त्री. १ कथील व नवसागर यांचे मिश्रण करून स्वयंपाकाच्या तांब्यापितळेच्या भांड्यांस जो लेप करतात तो , व तो देण्याची क्रिया . २ मुलगा ; पातळ थर ; सोन्याची कल्है अथवा रुप्याची कल्हई = दागिन्यावरचा मुलमा - सोन्याचा अथवा रुप्याचा . ३ भिंगामध्यें प्रतिबिंब दिसावें म्हणुन त्यास जो पार्‍याचा लेप देतात तो . आरशाच्या मागील पार्‍य़ाचा लेप , मुलामा . ' आरसे आहेत , ज्यांची कल्हई उडाली असेल व पालखीस लागू होते असे असतील ... ते हुजर पाठवावे .' - रा १२ . १४२ . ( अर . कलई = कथील )
०करणें   क्रि . १ झिलई , पातळ हात , , लेप देणें ; चकचकीत करणें ; वरच्या अंगानें चकाकी आणणें . २ ( ल .) सावरासावर करणें ; वाईट बाजूवर पांघरून घालून चांगली बाजू पुढें मांडणें ; एखाद्या गोष्टीस वरवर चांगलें स्वरुप देणें . ३ उगीच उपद्‌व्याप करणें ; उद्योग , स्तोम माजविणें , फुगविणें ( साधरण दुखापत वगैरेचे ). ४ ( विनोदानें ) पुरणपोळींत पुरण वगैरे थोडें भरणें ;
०चा वि.  १ ज्याला कल्हई केली आहे असा . २ ( ल .) वरवर धुतलेला ; किंचित उजळ केलेला ; चकचकीत केलेला .
०कार   गर गार - पु . भांड्यांकुड्यांना कल्हई लावणारा . ( अर . कलई = कथील + फा . गर ( म . कर ).)
०करप   ( गो .) ( ल .) सारवासारव करणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP