|
स्त्री. १ द्या करण्याबद्दल परोपरीची विनवणी ; कळवळा उप्तन्न करण्यासाठी गयावयां करुन प्रार्थना , विनंति करणें , करुन भाकणें . ( क्रि०करणें ). २ करुणा ; दया ; अनुकंपा ; कळवळा . ( क्रि०येणे ; करणें ) ' देवाला भक्ताची काकळुत आली .' बा गड्यानों , तुमची मला काकळूत वाटत्ये .' - बाळ १ . ७० . ८० . ३ दयेमुळें अपराधाची उपेक्षा करण्याची बुद्धि . ( सं . काकलि = मंजुळ , बारीक , मृदु ; तुल . का कक्कलाते = प्रेम , दया , काकळूत ) काकळुतीस येणें - अंतःकरणाला पाझर फुटविण्यासारखा रीतीनें गयावयां करणें . काकुळती करणें - १ दया येणें ; विनवणीनें हृदयाला द्रव येणें , २ अति दीनवाण्यारीतीनें , पदर पसरून , कळवळ्यानें मागणें . काकुळतां करणें , काकुळती येणें -( राजा .) दया भाकणें ; द्रव्य येईपर्यंत विनवणी करणें . काकळुत वाणा - णी - वि . दीनवाणा ; रडवा ( स्वर , ध्वनि , वाणी ) .
|