Dictionaries | References

काळ्या दगडावरची रेघ

   
Script: Devanagari

काळ्या दगडावरची रेघ     

ना.  अबाधित , अक्षम्य , काळेशार , टिकाऊ , ठाम , न बदलणारी , निश्चल , पक्की ( गोष्ट , उक्ति इ .).

काळ्या दगडावरची रेघ     

१. कधी पुसले जाणार नाही असे लिखाण
चिरंजीव लेख. २. (ल.) अक्षय गोष्‍ट
अबाधित गोष्‍ट, उक्ति
न फिरणारे वचन, भाषण, शब्‍द, दृढनिश्र्चय. ‘ही आपली माझी काळ्या दगडावरची रेघ.’-तोबं १७९. ‘हे भोसल्‍याशी लढायचे नाहीत! अगदी काळ्या दगडावरची रेघ!’ -शिसं २.३. ‘जुलमाचे जोखड आपल्‍या मानेवरून काढून टाकण्याला त्‍या लोकांना कित्‍येक वर्षे लागोत, पण तसा प्रयत्‍न केल्‍याशिवाय ते कधीहि राहणार नाहीत, ही काळ्या, दगडावरची रेघ समजावी.’ -केसरी १६.७.४०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP