Dictionaries | References

काशीत मल्‍हारी महात्‍म्‍य

   
Script: Devanagari

काशीत मल्‍हारी महात्‍म्‍य     

काशीत विश्र्वेश्वराचे महात्‍म्‍य सांगण्याऐवजी मल्‍हारीचे महात्‍म्‍य सांगणें म्‍हणजे अनाठायी वक्‍तव्य करणें. उदा०-‘म्हैसूर विद्यापीठाचा पदवीदान समारंभ ता. ४-१०-४
रोजी म्‍हैसूर येथे साजरा झाला. या समारंभासाठी ईस्‍टर्न ग्रूप कौन्सिलचे एक ऑस्‍ट्रेलियन सभासद सर बट्रॉम स्‍टीव्हेन्स यांनी विद्यापीठाच्या स्‍नातकांना उपदेश केला. युद्धाच्या पर्वणीत राष्‍ट्रांतील उद्योगधंद्यांची वाढ मोठ्या प्रमाणात चालू असल्‍यानें ईस्‍टर्न ग्रूपमध्ये मोडणार्‍या घटकांनी एकमेकांच्या सहकार्यानें साम्राज्‍य सरकारास विजय मिळवून द्यावा वगैरेसारखे प्रवचन विद्यार्थीयांपुढे त्‍यांनी झोडले. केवळ यदृच्छेने जसे दोन ओढे एकत्र येतात व पुनः फुटून दुसरीकडे जातात, तद्धत्‌ महायुद्धाचा वणवा संपला म्‍हणजे ‘‘यूयं यूयं वयं वयं’’ असा जप होण्यास जेथे सुरवात होणार तेथे भलतेच पांडित्‍य विद्यार्थीयांपुढे मांडून त्‍यांतून काही लभ्‍यांश होईल असे आम्‍हांस वाटत नाही.’-केसरी १४-१०-४१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP