Dictionaries | References ख खोळी Script: Devanagari See also: खोळ Meaning Related Words खोळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीपु . १ पोकळ पिशवी ; अभ्रा ( गादी , उशी , रजई , अंगरखा याची - आंत कापुस भरण्यासाठी ). ' जें ऐसेंही परि विरुळें । इये विज्ञानाचियें खोळें । हालवलेंही न गळे । त परब्रह्मा । ' - ज्ञा ८ . १७ . २ ( ल .) खळगा ; खळी . ' अहो आकाशाचिये खोळे । दिसती ग्रहगणांची कुळे । ' - ज्ञा . ११ . २५८ . ३ पावसापासुन रक्षण होण्याकरितां केलेली ( खांद्यावरील कपडा किंवा घोगडें यांची ) घुगी ; झुल . ' कीं काळपुरुषाची कांबळी । कीं गजावरी खोळ घातलीं । ' - रावि ३१ . १८ . ४ मुलांची कुंची ; घुगी . ५ ज्यानें गर्भ वेष्टिलेला असतो ती वार ; जार ; गर्भवेष्टन ; गर्भाशय . ' एकी त्वचेची खोळ । काढोनि दिधली स्वहस्तकीं । ' - मुआदि ११ . १४८ .' त्वचेविण गर्भ खोळे । ' - दा ३ . १ . ३१ . ६ तोंडावरुन पायापर्यंत घेतलेलें पांघरुण . - तुगा . २२३२ . ७ बायकांची वस्त्रांची ओटी ; ओटी . ' वाढविली न्हाणी खोळा भरली सुईणी ' - वसा ६२ . ८ गवसणी . ' भरौनि आणि ख्ळ । उन्मेषांचे । ' - ऋ २८२ . ९ ( व . ना ) जाजमासारखें पांघरावयांचें एक वस्त्र . १० देवाच्या मुर्तीवर शेंदराचें चढलेलें जाड पुट ; कवच ११ ( ल .) अडचण ; सांदीकोंदी ' वरी खोले घातला ' - गीता १ . ६७९ . १२ . आच्छादन ; सापाची कात . ' सांडुनि आंगीची खोळी । सर्प रिगालिया पाताळीं । ' - ज्ञा १४ . ३१२ . १३ पिशवी ; झोळी . ' तो बागुलाचें मारु । प्रतिबिंब खोळेभर । ' - अमृ ६ . ५१ . १४ गुहा . १५ बाणांचा भाता . ( सं . खोल - शिरस्त्राण ; सं . खोलि = बाणांचा भाता . प्रा . खोल - वस्त्रेंद्कदेश ?) स्त्री. १ मृत पशूचें चामडें . २ मृत देह ; मढें . हरिणीविण खोळी पडलीसे वोस । दशादिशी पाडस भ्रमताती ॥ ' - नामगा .पुस्त्री . १ खोळ अर्थ १ , २ , ३ पहा . लेवोनि खोळि पंचभूतांची । ' - परमा ४ . १४ . २ कात ( सापाची ). सांडुनि आंगीची खोळी । सर्प रिगालिया पाताळीं । ' - ज्ञा . १४ . ३१२ .०कर वि. सुरकृत्या , चिरण्या असलेली ( ठिगळ दिलेली , शिवलेली जागा , शिवन ). खोळ ( ल ) बुंथ - स्त्री . ( महानु ) घुंगट ; अंगावर घेण्याचें जाड वस्त्र . ' स्याळेंदीस तरी खोलबुंथ घालिति ' - पुजावसर . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP