Dictionaries | References ग गाहाण Script: Devanagari See also: गाहण , गाहणपाहण Meaning Related Words गाहाण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A pawn or pledge. Pr. सोनें गा0 त्याला मामा जामीन कशास? गाहाण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A pawn or pledge. गाहाण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : गहाण गाहाण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. तारण ; कर्ज देतांना तें उगवेल किंवा नाहीं यासाठीं विश्वासार्थ जो माल ( दागिना , जमीन ) घ्यावयाचा तो . २ ( कायदा ) कर्ज फेडलें जाईअल किंवा दिलेलें वचन पुरें होईल अशाकरितां माल तारण देणें ( इं . ) प्लेज . कर्जानें घेतलेली रक्कम फेडण्यासाठीं किंवा इतर आर्थिक जबाबदारी पार पाडण्यासाठीं तारण म्हणून जेव्हां स्थावर मिळकतीवरील एखादा मालकी किंवा इतर हक्कसंबंध ( इंटरेस्ट ) मालक दुसर्या इसमाला तबदील करून देतो तेव्हां त्या व्यवहारास गहाण अशी संज्ञा आहे . - घका २९ . [ हिं . गहना ; तुल०सं . ग्रहण ? ] म्ह० सोनें गहाण त्याला मामा जामीन कशास ? सामाशब्द -०खत चिठ्ठी पत्र रोखा - नस्त्रीनपु . १ ज्या पत्राने गहाण टाकलेल्या मिळकतीचा कबजा सावकाराला देण्यांत येतो तें . - घका ४ . २ विद्यमान किंवा पुढील कर्जाबद्दल एक मनुष्य स्वत : चे मिळकतीवर दुसर्यास कांहीं हक्क उत्पन्न करून देतो असा लेख . - जनरलस्टँपचा कायदा ; ऋणको व धनको या दोघांमध्यें झालेला , पैसे व त्याबद्दल गहाण पावल्याचे कबुलीचा , लेख .०दार वि. तात्पुरतें गहाण धारण करणारा ; ज्याकडे गहाण आहे तो ( इंसम ).०पाहण गाहाण पहा . [ गाहाण द्वि . ]०लाहण न. १ ज्यांत कर्जाऊ रक्कम व्याजासह गहाण मालाच्या किंमतीपेक्षां जास्ती होते अशी गहाणाची भानगड , गहाण सोडून देऊन मिटविणें . ( क्रि० करणें ). २ विशेषण किंवा क्रिवि . प्रमाणेहि उपयोग होतो .०वट क्रिवि . गहाणांत ; गहाणासारखी . - वि . गहाण ठेवलेली ( वस्तु ) [ गहाण + वट प्रत्यय ] - णाचा व्यापार - रोजगार - पु . गहाणावर पैसे कर्जाऊ देण्याचा धंदा ; सावकारी . गमावलेला ; चुकलेली ( वस्तु , प्राणी ). २ गफलती ; गोंधळी अव्यवस्थित ; विसराळू ( मनुष्य , काम ). [ सं . गाह = लपणें ] गाहाळणें , गाहळणें - उक्रि . हरवणें ; गमावणें ; गैरविल्हेस लागणें . - अक्रि . चुकणें ; आड मार्गास लागणें . तो आपण यया गाहाळला । - गीता १ . १४२६ . [ गाहाळ ] गाहाण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सोने गहाण त्याला मामा जामीन कशास?जेथे आपला माल चांगला आहे तेथे तो खपविण्यास वशिला कशाला? सरळ व्यवहार जेथे होत आहे तेथे वगवशील्याचे काम नसते. आपली योग्यता असल्यावर दुसर्याचा आश्रय कशास घ्यावा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP