Dictionaries | References

चत्वार

   
Script: Devanagari

चत्वार

 वि.  चार . [ सं . ]
०गुण  पु. चार प्रकारचे गुण . तमोगुण रजोगुण । सत्वगुण शुध्दसत्वगुण । ऐसे हे चत्वार गुण । चौदेहाचे । - दा १७ . ९ . ५ . [ सं . ]
०देह  पु. चार प्रकारचे देह . स्थूळ सूक्ष्म कारण माहाकारण । ऐसे हे चत्वार देह जाण । - दा १७ . ९ . १ .
०भूतग्राम  पु. जारज , अंडज , स्वेदज आणि उद्भिज्ज या चारांचा समुदाय .
०भोग  पु. चार प्रकारचे भोग . स्थूळभोग प्रविक्तभोग । आनंदभोग आनंदावभासभोग । ऐसे हे चत्वार भोग । - दा १८ . ९ . ३ .
०मुक्ति  स्त्री. चतुर्विध मुक्ति पहा . पहिली मुक्ती ते स्वलोकता । दुसरी ते समीपता । तिसरी ते स्वरूपता । चौथी सायोज्य मुक्ती । - दा ४ . ९ . २९ .
०वर्ण  पु. ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य , शूद्र हे चार वर्ण .
०शक्ति  स्त्री. चार शक्ती ; चार प्रकारचें सामर्थ्य . क्रियाशक्ति द्रव्याशक्ती । इच्छाशक्ति ज्ञानशक्ती । ऐशा चत्वार शक्ती । - दा १७ . ९ . ६ .

चत्वार

   चत्‍वार गुण
   चार प्रकारचे गुणः-
   तमोगुण,
   रजोगुण,
   सत्‍वगुण,
   शुद्ध सत्त्वगुण. -दा १७.९.५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP