|
चबकल पहा . त्याबरोबर तें दार नरमाद्यावर फिरून पितळेच्या चौकटीत सट्टदिशीं आवाज करून चपखल बसले . - कोरकि ३६६ . चबक , चबकण , चबका यांचा उच्चारभेद . चबक इ० शब्द पहा . पु. १ चपकन मारलेली थाप , चापट , चापटी ; रपका ; तडाखा ( क्रि० देणें ). बचक पहा . २ ( गो . ) पंजा . [ चप ] पु. १ मोरचूत , टाकणखार , काव इत्यादि लावून दागिना किंवा सोने तावणें व तें विस्तवांत घालणें . ( क्रि० देणें ). २ उजळा , जिल्हाई देण्याची एक तर्हा , रीत , पध्दत . ३ दहीं , ताक वगैरेचा आंबटपणा मोडण्यासाठीं तापविलेल्या पळींत तेल , जिरे , हिंग , मोहर्या वगैरे घालून ती पळी दहीं इ० कांत बुडविणें किंवा घालणें ; फोडणी . [ चप हिं . चपकाना ] स्त्रीअव . ( खा . ) चमका .
|