|
पु. १ सोंगटया , बुध्दिबळांचा खेळ . २ बुध्दिबळाचा , सोंगटयांचा पट , इ० - वि . १ चार सोंगटयांसंबंधीं ; चार सारांसंबंधीं ; बुध्दिबळाच्या खेळांतील एक पारिभाषिक शब्द . २ ( प्रां . ) चौकोनी . [ सं . चतुर = चार + चार = बुध्दिबळांतील सोंगटी . प्रा . चउसार ] चौसारणी , चौसरणी - स्त्री . चौथ्यानदां ( नां रण्याची , वाचण्याची आवृत्ती करण्याची ) क्रिया करणें . - क्रिवि . चौथ्यानें चौथ्यानदां . [ चौसार ] चौसारणें , चौसरणें - उक्रि . ( नांगरणें , वाचणें , उजळणी करणें . इ० क्रिया ) चौथ्यांदा करणें ; चवथी पाळी करणें . [ चौ + सारणें ]
|