-
See : एकावन्न, एकावन्न
-
See : इक्कावन, इक्कावन
-
एकावन्न ग्रंथ भेद (तत्त्वज्ञान विषयक)
१ निगम ग्रंथ, ४ वेद, ५ आगम ग्रंथ, ६ शास्त्रें, १४ विद्या व १८ पुराणें मिळून एकावन्न ग्रंथ प्रकार होत. ([दर्शन प्रकाश])
-
एकावन्न शक्तिपीठें
१ हिंगुला, २ शर्करार, ३ सुगन्धा, ४ काश्मीर, ५ ज्वालामुखी, ६ जलन्धर, ७ वैद्यनाथ, ८ नेपाळ, ९ मानस, १० विरजाक्षेत्र - (उत्कल), ११ गंडकी, १२ बहुला, १३ हरिसिद्धि (उज्जयिनी), १४ त्रिपुरा, १५ चहल, १६ त्रिस्त्रोता, १७ कामगिरी, १८ प्रयाग, १९ जयन्ती, २० युगाद्या, २१ कालीपीठ, २३ किरीट, २३ विशालाक्षी -(वाराणसी), २४ कन्याश्रम, २५ कुरुक्षेत्र, २६ मणिबंध, २७ श्रीशैल, २८ कामाक्षी - कांजीवरम् ), २९ कालमाधव, ३० शोणदेश, ३१ रामगिरि, ३२ वृंदावन, ३३ शुचि, ३४ पंचसागर, ३५ करतोया तट, ३६ श्रीपर्वत, ३७ विभाष, ३८ प्रभास, ३९ भैरव पर्वत, ४० जनस्थल, ४१ सर्वशैल, ४२ गोदावरी तीर, ४३ रत्नावली, ४४ मिथिला, ४५ नलहाटी, ४६ कर्णाट, ४७ वक्रेश्वर, ४८ यशोर, ४९ अट्टहास, ५० नंदिपूर, व ५१ लंका,
भारतांतील हीं एकावन्न शक्ति पीठें आहेत. ([कल्याण शक्ति अंक])
कोणी कोणी ही संख्या ५२ मानतात. ५२ वें मराठवाडयांतील तुळजापूर होय.
असा उल्लेख ऐने अकबरी या ग्रंथांत आहे. ([Ayeen Akbery पृ. ३९६]).
Site Search
Input language: