-
पु. १ रंग ; वर्ण ; छटा . २ रंगविणें ; रंग देणें ; रंजन . ३ लाली ; आरक्तपणा . फुल्ल पलाशवनीची होय सखी शोणितार्द्र - तनु रागें । - मोकर्ण १५ . ६ . ४ प्रीति ; आवड . मग द्वेषस्वभावें । नाशतील । - ज्ञा २ . ३३१ . [ सं . राग ; रंज् ]
-
पु. १ क्रोध ; संताप ; कोप . २ संस्कृतांत हा शब्द क्रोध किंवा दु : ख , आनंद , क्रोध , इच्छा , हेवा इ० मनोविकार सामान्यतः दर्शवितो . [ सं . ] म्ह० राग खाई आपणांस संतोष खाई दुसर्यास . एखाद्याचा राग करणें - ज्यावर आपला राग आहे तो दृष्टीस पडला किंवा त्याची गोष्ट निघाली कीं रागावणें ; त्याचा कंटाळा करणें . एखाद्याला
-
पु. ( संगीत ) पांच स्वरांपेक्षां कमी नाहीं असा वादीसंवादी स्वर व आरोह - अवरोह यानीं शोभा आल्यानें जो जनमनरंजनास योग्य होतो असा स्वरसमुदाय . षड्जादि स्वरांची परस्पर जुळणी केल्यानें गायनास योग्य होणारा त्यांचा रचनाविशेष . हल्ली प्रचारांत सुमारें दीडशें राग मानितात त्यांचीं नांवें :- अडाणा , अभिरी , अल्लैया , अहीरभैरव , आसावरी , कानडा , काफी , कामोद , कलिंगडा , कुकुभबिलावल , केदार , कौशी , खट , खमाज , खंबायती , गारा , गुजरी तोडी , गुणकली , गौडमल्लार , गौडसारंग , १ गौरी , २ गौरी , चंद्रकांत , चांडणीकेदार , छायानट , जयजयवंती , जयंत , जयत्कल्याण , जलधरकेदार , जेताश्री , जैमिनीकानडा , जोगिया , जौनपुरी , झिंझूटी , झीलफ , टंकी , तिलककामोद , तिलंग , तोडी , त्रिवेणी , दरबारीकानडा , दीपक , दुर्गा ( १ ), दुर्गा ( २ ), देवगांवार , देवगिरीबिलावल , देवसारख , देशकार , देस , देसगौड , देसी , धनश्री , धानी , नट , नटबिलावल , नटमल्लार , नायकी कानडा , नारायणी , नीलांबरीं , पंचडा , पटदीप , पटदीपिका , पटमंजरी ( १ ), पटमंजरी ( २ ), परज , पहाडी , पीलू , पूरिया ; पूर्या धनाश्री , पूर्वी , प्रतापवराळी , प्रभात , बंगालभैरव , बडहंस , बरवा , बहादुरीतोडी , बहार , बागेसरी , बिंद्रावनी सारंग , बिभास ( १ ), बिभास ( २ ), बिलावल , बिलाखानी तोडी , बिहाग , बिहागरा , भंखार , भटियार , भीमपलासी , भूपाळी , भैरव , भैरवी , मधुमादसारंग , मलुहाकेदार , मांड , मारवा , मालकौंस , मालवी , मालश्री , मालीगौरा , मियांमल्लार , मियांसारंग , मुलतानी , मिरामल्लार , मेघमल्लार , मेघरंजनी , मोटकी , यमनकल्याण , यमनीबिलावल , रागेश्वरी , रामकली , रामदासीमल्लार , रेवा , लंकादहनसारंग , लच्छासाग , ललित , ललित पंचम , लाचारीतोडी , वराटी , वसंत , वसंतमुखारी , शंकरा , शहाणा , शिवभैरव , शुक्लबिलावल , शुध्द कल्याण , शुध्द मल्लार , शुध्द सामंत , शुध्द सारंग , श्याम , श्री . श्रीरंजनी , सर्पर्दा बिलावल , साजगिरी , सामंत सारंग , सावनी कल्याण , सावेरी , सिंधभैरव , हमीर , हंसकंकणी , हंसध्वनि , हिजेज , हिंदोल , हुसेनी कानडा , हेम . श्री , रागोऽथ वसंतश्चभैरवः पंचमस्तथा । मेघरागो बृहनाट किंवा नटनारायण असे सहा पुरुष राग आहेत ( मोल्स्वर्थ कोशांत वरील श्लोक संगीतरत्नाकरांत असल्याबद्दल उल्लेख आहे परंतु उपलब्ध संगीतरत्नाकर ग्रंथांत हा श्लोक आढळत नाहीं ). काव्यांत व पुराणांत यांवर चेतनधर्माचा आरोप केला असून प्रत्येकाला रागिणीनामक सहा ( कांहींच्या मतें पांच ) स्त्रीरूपें मानिलीं आहेत . सामाशब्द -
-
०माला माळा मालिका माळिका - स्त्री . १ गीताचा एक प्रकार ; स्वरांची किंवा अनेक रागभेदांची मालिका ; निरनिराळया रागांत म्हणतां येण्यासारखें गीत . २ किल्ली दिली असतां अनेक रागांचे सूर ज्यामधून निघतात असें यंत्र ; पियानोफोर्ट नामक वाद्यासहि म्हणतात . [ सं . राग + माला ]
Site Search
Input language: