|
क्रि.वि. १ पायांतील पैंजण , नुपूर इ० कांचा झुनझुन असा आवाज होऊन . ( क्रि० वाजणें ). झुणझुणशब्दा करिति घागर्या तालावरतीं गाती । - कमं ४ . १०९ . २ सूं सूं करीत ; सोंसावत ; गोंगावत ( वारा वाहणें ). [ घ्व . झुण द्वि . ] झुणझुणणें - अक्रि . १ ( वारा इ० कानें ) सूं सूं , घो घो करणें , गोंगावणें , घोघाटणें . २ ( वीणा , बीन इ० तंतुवाद्यानें ) तनन तनन , तुन तुन करणें . ३ ( पायांतील पैंजण , वाळे इ० कानीं ) झन झन , छुमछुम असा आवाज करणें ; रुणझुणणें ; छुमछुमणें . ४ फुणफुणणें ; सणसणणें ; झणझणणें . झुणझणा , झुणझुणी - स्त्री . लहान मुलांचा एक प्रकारचा खुळखुळा . [ झुणझुणणें ]
|