Dictionaries | References

झोंक

   
Script: Devanagari
See also:  झोक

झोंक     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : आवेश

झोंक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Ex. कोण्हीं कसाही शब्द सांगितला हा बोलण्याच्या झोंका- खाली नेतो. देशाकाळाचा झोंक पाहून वागावें We should conform ourselves to the requirement of time, place, and circumstances.

झोंक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Inclination, leaning over. Direction, bent, bearing, tendency. An air or affected manner. A forceful sweep.
झोंक पाहून वागावें.   We should conform ourselves to the requirement of time, place and circumstances.

झोंक     

 पु. १ कल ; ओळंब्यांतून एकीकडे कलणें ; झुकणें ; तोल ( क्रि० जाणें ). डोंगरावरून उतरतांना झोक गेला तर रसातळाला जाण्याची भीति . २ ( ल . ) वळण ; रोंख ; कल ; दिशा ; मोडणी ; रीत ; चाल ; वृत्ति ( सैन्य कूच करतांना , स्वभावाची , भाषणाची इ० ). वामनरावांचे बोलण्याचा झोक माझे लक्षांत आला . ३ वार्‍याचा मोठा झोत ; वादळाचा तडाखा , झटका . ४ झपाटा ( वस्त्राच्या पदराचा ). ५ ( ल . ) भाषणाचा प्रवाह , वेग . कोणी कसाहि शब्द सांगितला तरी हा बोलण्याचे झोंकाखालीं नेतो . श्लोक वाचण्याचा झोंक थांबवून अर्थाकडे धांवावें लागतें . - विवि ८ . ७ . १२४ . ६ प्रवृत्ति ; तालमान ; रीत . देशा - काळाचा झोंक पाहून वागावें . [ हिं . झुकणें झोक ]
०चिट्टी   चिठ्ठी - स्त्री . १ एखाद्यानें , एखाद्यास , एखाद्यावर काम न होण्याजोगी दिलेली चिठ्ठी ; रोखा , करारपत्र ( ज्यामुळें ती घेणाराची निराशा होईल असें ). २ ( ल . ) व्यर्थ दिलेला हेलपाटा ; कपटवचन ; खोटी आशा . ( क्रि० देणें ).
०पट्टी  स्त्री. पोकळवचन ; भूलथाप ; फुसलावणी . झोकचिठ्ठी पहा . ( क्रि० देणें ). झोकली बातमी - स्त्री . उडत बातमी ; हूल ; अफवा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP