|
स्त्री. १ घोडयाच्या पुढील पायाचा होणारा टट्टट असा आघात ; घोडयानें मागील पायानें मारलेली लाथ ; त्याचा तळपाय . ( क्रि० मारणें ). ३ मर्मभेदक टीका ; टोमणा ; निर्भर्त्सना . ( क्रि० मारणें ). ४ छाट ; तासणी . ( क्रि० मारणें ). ५ आई जवळ नसतांना लहान मुलानें घेतलेली खंत , ध्यास , तळमळ . ( क्रि० करणें ; घेणें ). ६ भाजीचें लहान झाड ; तशा झाडाचा खुंटलेला अग्रभाग . ७ - पु . लेखांत खुणेसाठीं केलेलें रेषादिरूप चिन्ह . ८ ( बे . ) ( वहाण , जोडा यांचें ) टांचेचें कापून तयार केलेलें कातडें टापेखालीं असणें , टाफेंखालीं असणें , टापेखालीं चालणें , टाफेंखाली चालणें , टापेखालीं राहणें , टाफेंखालीं राहणें , टापेखालीं वागणें , टाफेंखालीं वागणें - एखाद्याच्या हुकुमांत , ताब्यांत असणें .
|