Dictionaries | References

डगणे

   
Script: Devanagari

डगणे

 अ.क्रि.  १ कापणे ; थरथरणे ; डगमगणे . २ ( ल . ) घाबरणे ; भिणे ; डरणे . चित्ते दोन अशा स्थली न डगशी कोंबावया तू जरी । - केक ८४ . ३ खचणे ; मोडणे ; सुटून पडणे ( तुळई , भिंत इ० ); चळणे ; ढळणे . तू आपली श्रद्धा , भक्ति व धर्म यांपासून डगूं नकोस . - पप्रे १२७ . ४ भितरेपणाने मान्य करणे ; रुकार देणे ; दबणे . ५ कचरणे ; कांकू करणे . [ ध्व . डक - ग ]
 अ.क्रि.  वरुन टांग टाकणे ; ओलांडणे . [ हि . डग = पाऊल ]
 अ.क्रि.  तगणे ; चिकटणे ; चिकटून राहणे . [ डग . डिक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP