-
पु. ( संगीत ) एक राग . ह्या रागास षडज तीव्र ऋषभ , तीव्र गांधार , कोमल मध्यम , पंचम , तीव्र धैवत . कोमल निषाद हे स्वर लागतात . अरोहांत ऋषभ वर्ज्य जाति षाडव - संपुर्ण वादी गांधार व संवादी निषाद . गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर . ०थाट ( राग )- पु . एक थाटाचें नांव यांचे पुढील सात स्वर असतात - शुद्ध षडज शुद्ध ऋषभ शुद्ध गांधार , शुद्ध मध्यम , शुद्ध पंचम , शुद्ध धैवत , कोमल निषाद .
-
पु. १ शब्दांची जोडणी ; शब्दसंयोग ; शब्दांचें संयुक्तीकरण . पै गा समासां माझारी । द्वंद्व तो मी अवधारी । - ज्ञा १० . २७० . २ संयुक्त शब्द ; जोड शब्द ; सामासिक शब्द . ३ ( चुकीने ) संयुक्त शब्दांचें स्पष्टीकरण , विग्रह . ४ लेखाच्या बाजूस कागदावर सोडतात ती कोरी जागा ; कडा ; कूस ; मोकळी जागा ( इं ) मार्जिन . ५ संक्षेप . ६ ( गणित ) बेरीज . ७ अध्याय ; प्रकरण . प्रसंग माने समास पोथी । बहुधा नामें । - दा १२ . ५ . ४ . [ सं . सम् + अस = टाकणें , फेकणें ]
-
०भावना स्त्री. ( गणित ) गुणाकारांची बेरीज करून केलेली रचना , पदयोजना .
-
०रेषा स्त्री. पोथीच्या पृष्ठावर दोहों बाजूंस कोरी जागा असते त्या ठिकाणी मारलेल्या रेषा .
Site Search
Input language: