Dictionaries | References ड डोहाळा Script: Devanagari See also: डोहळणे , डोहळा Meaning Related Words डोहाळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun गर्भवती स्त्रीला खाण्यापिण्याविषयी होणार्या इच्छा Ex. आईने तिचे सर्व डोहाळे पुरवले. ONTOLOGY:संवेग (emotion) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:डोहळा दोहदWordnet:hinदोहद kanಇಚ್ಚೆ ಬಯಕೆ kokदुवाळो डोहाळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ गर्भवती स्त्रीची वासना ; इच्छा . वसिष्ठ म्हणे रायासी । धर्ममर्यादा आहे ऐसी । डोहळे पुसावे स्त्रियांसी । मांगती त्यांसी ते द्यावे । - भारा - बाल ४ . ३४ . २ अयोग्य इच्छा ; भलत्या गोष्टीवर वासना जाणे ; छंद ; हौस ; शोक . ( क्रि० पुरणे ; पुरविणे ). कैसे प्राप्तिचिये वेळे । निदैवा अंधळेपणाचे डोहळे । - ज्ञा ६ . ७३ . [ सं . दोहद ; प्रा . डोहला ] भिकेचा डोहळा आठविणे - ज्यामुळे भीक मागावी लागेल असे ढंग व्यक्त करणे ; व्यसनापायी उधळेपणा करणे . म्ह ० पोराचे चिन्ह डोहाळ्यावरुन ओळखावे . डोहळे , डोहाळ जेवण - न . डोहळतुलीला मेजबानी . पहिल्या गरोदरावस्थेत स्त्रीला डोहाळे लागू लागले म्हणजे ( हल्ली सातव्या महिन्यात ) सुवासनींना भोजनसमारंभ करतात ते . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP