|
स्त्री. १ गवई , तमासगीर इ० लोकांस ( राजे लोक खूष होऊन ) देतात ते मानाचे वस्त्र , पोशाख इ० ( सामा . ) अहेर ; नजराणा . पावल्याचा जाब दिधला लिहून । तसरीफ देऊन पाठविला । - तुगा ४४३६ . २ गांवकामगार , सरकारी नोकर इ० कांना बहुमानाचा पोशाख इ० देण्याचा विधि . ३ बहुमानाची वस्त्रे , जिन्नस , इ० ४ बहुमानाच्या पोशाखाऐवजी दिलेले वतन , जमीन . ५ ( गो . ) भेट ; नजराणा ( फळे , मिठाई , इ० चा ). [ हिं . अर . तश्रीफ ] ०ल्याख वि. नजर करण्यास योग्य ( वस्त्र , पोशाख इ० ).
|