|
पु. ताडाचे झाड . [ सं . ] पु. ( सांडलेले दूध , रक्त , तेल इ० कांचे ) थारोळे ; तळे . [ हि . ताल = तळे ] पु. १ ( संगीत . ) गीत , वाद्य व नृत्य ह्यांच्या क्रियेच्या गतीचे कालदर्शक नियमित प्रमाण ; ठेका . ( क्रि० धरणे ). प्रसिद्ध असे तीस ताल प्रचारांत आहेत . त्यांची नावे येणेप्रमाणेः - केहेरवा , दादरा , तीव्रा , रुपक , पस्तु , धुमाळी , मध्यमावती , गजल , ठेका , झपताल , सूलताल , रुद्रताल , भानुमती , चौताल , एकताल , खेमटा , फरोदस्त , अडाचौताल , झूमरा , दीपचंदी , धमार , सवारी , गजझंपा , तिलवाडा , त्रिताल , पंजाबी , टप्प्याचा ठेका , शिखर , विष्णुताल , मत्तताल व ब्रह्मताल . परोपरीचे गर्भे घालुनि नृत्यास रम्य बत्तिस या । करिती ताल धरुनियां ... - कमं ४ . १०८ . २ हातावर , दंडावर हात मारण्याची क्रिया ; टाळी वाजविण्याचीए क्रिया . ३ सम पहा . ४ ( नृत्य . ) हाताचा आंगठा व मधले बोट यांमधील जास्तीत जास्त अंतर . ५ कांशाचे एक वाद्यविशेष ( हे काठीने वाजवितात ); एक प्रकारचा टाळ . [ सं . ] सामाशब्द - पु. प्रयत्न ; खटपट . महाराजांपुढे तोंड वेंगाडून पैसे मिळण्याचा ताल करण्यापेक्षा , जर त्यांनी भिक्षांदेहि केली तर अधिक उत्तम . - विक्षिप्त ३ . १८२ . पु. ( कु . ) ज्यांत भरतीच्या वेळी पाणी चढते असा नदीकिनार्यालगतचा जमीनीचा भाग . [ सं . तल ] पुन . हरताळ . ( इं . ) आर्सेनिक . [ सं . ] पु. शिल्पशास्त्रांतील लांबीचें एक माप . बारा अंगुळें म्हणजे एक ताल . नरमूर्ति दहा तालांची ; क्रूरमूर्ति बारा तालांची कुमारमूर्ति सहा तालांचें . - भग्नमूर्ति . ११३ . स्त्री. १ ( पाणी अडविण्याकरिता , वळविण्याकरिता रस्त्यावर , शेतांत घातलेला ) बांध , बांधारा . २ नदी इ० कांच्या कांठाच्या बाजूने बांधलेला धक्क . [ सं . तल ] पु. ( चांभाराचा धंदा ) खुरा आणि तळ यांमधील जोड्याचा भाग . [ तळ ] पु. ( घर , इमारत इ० कांचा ) मजला . अस्मानी मंडप दिला तिन्ही तालांवरी वो । - तुगा २९१ . गेली घेउन प्राण प्रियकरासी तिसरे ताली । - प्रला १९४ . [ सं . तल = ताळ ] पु. पत ; सौदा ; व्यवहार . ' आपण व कारभारी यानी सावकाराच्या घरास जावे परंतु ताल न पटे .' - पेद ५ . ६० . पु. ( को . नाविक ) गलबताच्या नाळीच्या खांद्यास व वर्याच्या खांद्यास खालून बारीक लांकडे ठोकितात त्यांपैकी प्रत्येक . [ सं . तल ] पु. लोक ; प्रदेश . ' तुम्हांस रहावयास तीनहि तालीं कोठेंहि नाहीं .' - पटच . पु. स्त्री . वाफ्याची कडा . बाजू . - चित्रकृषि . २ . ६ . ०तंत्र न. ( वर्तन ; भाषण , मसलत इ० कांतील ) सुसंबद्धपणा ; संगति ; अविरोध ; ( विरु . ) ताळतंत पहा . [ ताळ + यंत्र ] ०तोडणे बढाई मारणे ; लंब्या लंब्या बाता झोकणे . सामाशब्द - ०भरणे सक्रि . जोड्याचा खुरा व तळ यांमधील भागांत भर घालणे . ०भस्म न. हरताळ भस्म . ०ताल क्रिवि . १ उंचउंच ; लंबेलंबे ; उद्दामपणाने . ( क्रि० उडणे ; बोलणे ; जाणे इ० च्यासह प्रयोग केल्यास लंब्या लंब्या बाता झोंकणे , बढाईखोरपणाने बोलणे असा अर्थ ). २ बेतालपणे ; बेबंदपणाने ; विसंगत ; असंबद्ध . हा तालताल जातो - गातो . त्याचे बोलणे , गाणे , ताल ताल जाते . तालताल बोलणे उडणे १ टाळाटाळीची उत्तरे देणे . २ विषयाला सोडून असंबद्धपणाने बोलत सुटणे ; भरमसाटपणाने बोलणे . ०थाक पु. गायन व नृत्य यांतील ताल आणि विरामाच्या जागा . गात्या नाचत्याचे ताल थाक । स्वये देख अनुकरे । - एभा २२ . ६०८ . [ ताल + थाक = थकणे , विश्राम ] बद्ध बंद वि . तालाला धरुन असलेले ( ख्याल , पद , गाणे इ० ). [ ताल + बद्ध = बांधलेले ] ०तोड्या वि. १ बढाईखोर ; मोठाल्या बाता झोकणारा . २ अरेराव ; धटिंगण . तालतोड्यांची पेंढारशाहीत चलती होती . - राको . [ ताल + तोडणे ] वृन्तहस्त पु . ( नृत्य . ) उद्वृत्त ( संयुतहस्त ) पहा . ०माल पु. धोरण ; अनुसंधान ; तानमान ; देशकालस्थितिचा मिलाफ , रागरंग ; ( विप्र . ) तालामाला ; तालामाला पहा . ते स्वतः आता विलायतेला जाणार , तेथील तालमाल पाहणार ... - सासं २ . २६४ . [ ताल द्वि . ] ०शुद्ध वि. यथाशास्त्र तालांनी युक्त ; संगीत शास्त्रदृष्ट्याअ बरोबर असलेले ; स्वरैक्याने युक्त ( पद , गाणे इ० ). ०सुरी क्रिवि . ताल व सूर यांना अनुसरुन ; ताल व सूर यांना न सोडता ; तालसुरांत ; शास्त्रशुद्ध . ( क्रि० गाणे ). ०ज्ञता स्त्री. तालासंबंधी ज्ञान . [ ताल + सं . ज्ञा = जाणणे ] तालादर्श पु . ताल व लय दाखविणारे एक पाश्चात्त्य यंत्र ; तालमापक . ( इं . ) मेट्रॉनम . [ ताल + आदर्श = आरसा ]
|