-
वि. स्वतःचे स्वकीय , आत्मीय ; आपले ; ( अत्यंत - शर ) - नस्त्री . स्वतःची कामे ( क्रि० सांगणे ; बोलणे ). म्ह ० निजेवाचून पुजा नाही = फुकट कोणी कोणाच्या उपयोगी पडत नाही . [ सं . ]
-
न १ मन . २ निजगुज ; विश्वरुप . ३ आत्मस्वरुप ; स्वस्वरुप . पाहें पां वालभाचे नि व्याजें । तिया व्रजांगनांचीं निजें । - ज्ञा ९ . ४६५ . [ सं ]
-
स्त्री. झोंप . तदुक्तिस जन प्रभो जरि निजेमधे चावळे । - केका ७३ . [ सं . निद्रा ] निजगळ - वि . ( ना . ) झोंपाळू . निजतीक्रिया - स्त्री . प्रेत निजल्या स्थितीत पुरणे .- बदलापूर १७२ . निजणे - अक्रि . १ झोंप घेणे ; झोंपणे . टपकण निज . महारपोर रात्र शिळी करतील . ( लहान मुलाला लवकर निजविण्यासाठी म्हणतात . ) २ आडवे होणे ; कलणे ; लोळणे . ३ आजारी पडणे ; हांतरुणाला खिळणे . ४ ( ल . ) मरणे . ५ नाश पावणे ; बुडणे ; नाहींसा होणे . ( धंद्यातील भांडवल , धंदा , व्यापार इ० ). ६ भरभराटीस न येणे ( दैव ); मंद चालणे ( कामधंदा ); नाहींसा होणे ( हुकमत , अधिकार ); बेचिराख , उजाड होणे ( घर , गांव ). ७ संभोग करणे . निजलेला मेल्यासारखा - मृतवत निजलेला व मेलेला सारखाच . निजल्या जागी विकणे - कारवाईने आपले काम साधणे ; बोटावर नाचविणे . निजून उठणे , उठत असणे - ( पहांटेस , लवकर )- प्रातःकाळी झोंपेतून उठणे किंवा उठण्याची संवय असणे . सावकाश निजणे - शांतपणाने झोंप घेणे ; बेफिकीरपणे झोंपणे . निजविणे - सक्रि . झोंपविणे ; दुसर्याला झोंपू देणे आडवे पसरविणे ; निजावयास लावणे . निजसुरा - वि . अर्धवट झोंपलेला अर्धवट जागा ; असावध . जेणे देहात्मवादी निजसुरा । - यथादी १ . ३८२ . निजानीज - स्त्री . सामान्यपणे निजणे ; सर्वत्रांचे निजणे ; शांतता ; सामसूम . निजायाबसायाजोगी - वि . ( बायकी ) घरकाम करण्यास योग्य झालेली , वयांत आलेली ( स्त्री . ) निजाळू - वि . झोपाळूं ; फार , नेहमी झोंप घेणारा . निजेला - वि . निजलेला ; झोंपलेला ( माणूस ). निजल्यामधे पुछ्य ते लोळताहे । - राक १ . ३३ . त्यांतील एक कलहंस तटी निजेला । - र ९ .
-
०कार्य न. १ आपले स्वतःचे काम . २ ब्रह्मज्ञान , आत्मज्ञान मिळविणे .
Site Search
Input language: