|
स्त्री. न . कोंकणी खलाटींतील सर्व प्रकारचें पीक . लंवग - वेलदोडे - जायफळ - केशर इ० सुवासिक पीक प्रत्येकीं . सुरईभात , तांदुळ - न . पु . अव . ( कों . ) उकडे नसलेले तांदुळ . न. १ भात , गहूं , बाजरी , इ० मनुष्याच्या शरीरपोषणाच्या उपयोगाचा पदार्थ ; दाणागोटा . तांदूळ , गहू , ज्वारी इ० तृणधान्ये हरभरा , तूर , उडीद इ० द्विदल धान्ये व करडई , तीळ , जवस इ० तैलधान्ये असे धान्याचे तीन मुख्य वर्ग आहेत . २ नवरात्रांत देवीपुढे किंवा चैत्रांत गौरीपुढे थोड्याशा मातीत गहूं किंवा भात यांची जी लहान रोपे करतात ती समुच्चयाने . ३ दसर्याच्या दिवशी पागोट्यांत , टोपींत , खोवण्यांत येणारा गहूं , भात इ० कांच्या रोपांचा तुरा . ४ धणे . [ सं . धान्य ; गु ; धान्य ] ( वाप्र . ) ०झटकणे धान्य साफ करणे , वारवणे . ०हुडकणे सक्रि . शोधणे ; निवडणे ; धुंडणे . पद्धति - एक लांब लोखंडी गज जमीनीत मारुन व त्याचा वास घेऊन अमुक ठिकाणी धान्य पुरले आहे असे नेमके सांगणे . लष्करांतील कित्येक लोकांचा धान्य हुडकून काढण्याचा धंदाच होता . - ख १०५५ . अठरा धान्यांचे कडबोळे न . अठरा पहा . सामाशब्द - ०देश पु. पुष्कळ धान्ये पिकणारा , सुपीक देश . [ सं . ] ०पंचक न. गहूं , तांदूळ , सातू , तीळ व मूग शंकरास लाखोली वाहण्यास योग्य अशी धान्ये . [ धान्य + सं . पंचक = पाचांचा समूह ] ०पंचकाचा - पु . धणे , वाळा , सुंठ , नागरमोथा आणि दालचिनी यांचा काढा . [ धान्य = धणे + सं . पंचक काढा ] काढा - पु . धणे , वाळा , सुंठ , नागरमोथा आणि दालचिनी यांचा काढा . [ धान्य = धणे + सं . पंचक काढा ] ०पलाल - पु . धान्य म्हटले म्हणजे त्यामध्ये त्याचा पेंढाहि अंतर्भूत होतो . त्यास वेगळे महत्व नसते . राजाला जिंकल्यावर प्रजाहि स्वाभाविकपणे जिंकल्या गेल्या असे मानण्यास हरकत नाही . यावरुन एखादी मुख्य गोष्ट साध्य , सिद्ध झाल्यावर तदनुषंगिक बारीकसारीक गोष्टी आपोआपच साध्य , सिद्ध होतात . [ धान्य + सं . पलाल = पेंढा , गवत ] धान्य - पु . धान्य म्हटले म्हणजे त्यामध्ये त्याचा पेंढाहि अंतर्भूत होतो . त्यास वेगळे महत्व नसते . राजाला जिंकल्यावर प्रजाहि स्वाभाविकपणे जिंकल्या गेल्या असे मानण्यास हरकत नाही . यावरुन एखादी मुख्य गोष्ट साध्य , सिद्ध झाल्यावर तदनुषंगिक बारीकसारीक गोष्टी आपोआपच साध्य , सिद्ध होतात . [ धान्य + सं . पलाल = पेंढा , गवत ] ०फराळ पु. उपवासाच्या दिवशी धान्य भाजून केलेले , कोरडे खाद्य पदार्थ इ० काने केलेला फराळ . [ धान्य + फराळ ] ०भिक्षा स्त्री. धान्याची मळणी होत असतांना भिक्षुक गांवोगांव फिरुन मिळवितात ती धान्याची भिक्षा , बलुते . [ धान्य + भिक्षा ] ०माप न. धान्य मोजावयाचे माप , परिमाण उदा० शेर , पायली इ० . ०वणवा वी - पुस्त्री . अकस्मात धान्य जळून खाक होणे . अग्न लागला शेती । धान्य वणव्या आणि खाडखुती । युक्ष दंड जळोनि जाती । अकस्मात । [ सं . धान्य + म . वणवा ]
|