|
न. एक तृणधान्य ; टरफलासह तांदूळ ; साळी . हळवें व गरवें अशा भाताच्या दोन मुख्य जाती ; यांत पन्नास प्रकार आहेत . - पु . स्त्री. न . कोंकणी खलाटींतील सर्व प्रकारचें पीक . लंवग - वेलदोडे - जायफळ - केशर इ० सुवासिक पीक प्रत्येकीं . सुरईभात , तांदुळ - न . पु . अव . ( कों . ) उकडे नसलेले तांदुळ . तांदूळ शिजवून करतात तें अन्न . याचे साधा भात , वांगीभात , साखरभात इ० अनेक प्रकार करतात . अस्तमानीं कधीं रात्रीं भातभक्षिती पाटावरती । - ऐपो ४०१ . जोंधळ्याच्या कण्या शिजवून करतात तें अन्न ; जोंधळ्याचा भात . ( ल . ) नासकें , नासलेलें फळ . ( ल . ) चिघळत चाललेली जखम . [ सं . भक्त ; प्रा . भत्त = ओदन ; पं . भत्त ; सिं . भतु ; हिं . गु . बं . भात ] ०मोडणें ( राजा . ) भात विकणें . ०राबणें भाताचे भारे रचल्याबरोबर भात झोडलें तर मोडतें म्हणून कांहीं दिवस उडवी तशीच ठेवणें . - कृषि २३९ . सामाशब्द - ०कण कूण - पु . टरफल असलेला तांदुळाचा दाणा ; साळीचा दाणा . - न . तांदुळांत मिसळलेली किंवा त्यांतून निवडून काढलेली निवड ; भातगोटे . ०करी कार - पु . भाताची लागवड करणारा शेतकरी . ०कांडे - पुअव . लागेल तसें भात थोडें मुसळानें कांडून केलेलें तांदूळ . तांदूळ - पुअव . लागेल तसें भात थोडें मुसळानें कांडून केलेलें तांदूळ . ०खळें न. भात झोडपण्यासाठीं व तुडविण्यासाठीं केलेलें खळें . ०खाऊ भरु भोंकण्या बोकण्या भोंक्या - वि . भाकरखाऊंनीं प्रायः भात खाणार्या लोकांबद्दल उपहासार्थ योजावयाचा शब्द ; नुसता भात खाणारा , भरणारा माणूस . कोंकणच्या भातबोकण्यांना आपण कित्येक कामांत चीत करुं . - कोरकि ६६९ . रिकामटेकडा ; कांहीं उद्योगधंदा न करतां खाणारा . सर्व भातखाऊ मिळालेत सारे । - रामदासी २ . ५४ . म्ह० कोंकण्ये आणि भातबोकण्ये . ०गोटा पु. टरफलें काढून टाकलेल्या तांदुळांत राहिलेला टरफलासहित दाणा ; भातकण . ( गो . ) शितकण . ०जमीन स्त्री. भाताच्या पिकास योग्य अशी जमीन . ०वणी स्त्री. ( गो . ) पेज . ०शेत ती - नस्त्री . भात पेरावयाचें शेत . भाताच्या लागवडीस योग्य अशी जमीन ; भातजमीन ; खाचर . ०शेती वि. भातशेतासंबंधीं ( जमीन , वसूल , लोक इ० ). ०साण स्त्री. कुजलेल्या भाताची , कोंड्याची घाण . भातण , भातेण , भात्याण , भात्येण न . पेंढा ; भाताच्या काड्या ; भाताचें पीक काढून घेतल्यानंतर उरतात त्या काड्या , गवत इ० [ भात + तण ] भातळ वि . ज्यांत बरेच भातगोटे राहिले आहेत असे ( तांदूळ ). भाताचा पिंड पु . केवळ भातावरच पोसलेला इसम . भाताणी गवत न . राबाला उपयोगी पडणारें भातगवत . पेंढ्याची गूत वगैरे . - बदलापूर ३१ .
|