Dictionaries | References

आधीं भात खाऊन मग जात विचारावी

   
Script: Devanagari

आधीं भात खाऊन मग जात विचारावी     

आपल्याला भूक लागली असली व कोणी भात आणून दिला तर त्याच्या जातीची वगैरे चौकशी न करतां प्रथम आपली भूक भागवून घ्यावी. क्षुधाशमन करणें हे प्रथम कार्य, ते झाल्यानंतर इतर गोष्टी
नाहीतर प्रथमच त्या माणसाची जात वगैरे विचारली व त्या जातीच्या हातचें अन्न आपणांस निषिद्ध असले तर क्षुधा शमन होणार नाही. तेव्हां गौण गोष्टी बाजूला ठेवून प्रथम आपले कार्य साधून घेण्याकडे दृष्टि ठेवावी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP