Dictionaries | References

धौशा

   
Script: Devanagari
See also:  धोंशा , धोशा , धौंशा , धौंसा , धौसा

धौशा     

 पु. १ ( एखादे कार्य करण्याविषयींचा ) नेटाचा , झटून केलेला , निकराचा प्रयत्न ; आवेश व परिश्रमयुक्त कार्य ; ( एखाद्या गोष्टीवर , कार्यावर ) तुटून पडणे ; निकराचा हल्ला . ( क्रि० लावणे ) चार दिवस लढाईचा धोशा लावला तेव्हां किल्ला सही झाला . २ ( एखाद्याशी केलेली ) उद्दामपणाची , दंडेलीची वर्तणूक ; कांच ; जाच ; छळ . नवर्‍याने मला धौंसा लावला आणि त्याच्या धौशाने मी वाळल्ये . त्याच्या धौशामुळे त्याच्या बायकोने जीव दिला . ३ धाक ; भीति . धोशा धुळपाचा अति आनंदराव रणशूर । - ऐपो ४५१ . ४ मनाला लागलेली टोंचणी ; ध्यास ; धोसरा ; ससेमिरा . येऊनजाऊन भाषांतराचा धौशा . - नि १९५ . ५ सपाटा ; तडाखा ; ठोका ; सारखा क्रम . जसेः - पेरणीचा - कापणीचा - नांगरण्याचा - पढण्याचा - लिहिण्याचा - कांही एक करण्याचा - धोशा . मधून त्याने पाण्याचा धोशा लावून द्यावा . - विवि ८ . ८ . १५३ . [ हिं . धौस = धमकी , चढाई , आक्रमण ]
 पु. १ मोठी नौबत ; नगारा . २ ( ल . ) डंका ; गाजावाजा ; बोभाटा . ( क्रि० गाजविणे ; होणे ). ३ निशाण ; ध्वज . ४ ( ल . ) मोठा लौकिक ; नांव ; बडेजांव ; गाजावाजा ; प्रसिद्धि . ५ हल्ला ; रणकंदन . चोहोंकडून हर ! हर ! म्हणोन घोडे घातले ; एकच धौशा केला . - भाब १२१ . ( नवीप्रत ) ६ मर्दुमकी ; पराक्रम ; यशाचा झेंडा . या प्रमाणे यश संपादून धौशा गाजवून जानकोजी शिंदे शहाजणे वाजवीत गोटास चालले . - भाब १३५ . [ ध्व . हिं . धौंसा - नगारा ]
०लावून   क्रिवि . ( ल . ) वाजतगाजत व निशाणे फडकावीत ( जाणे , येणे इ० ). मी कांही तुम्हासारखा र र करीत येणार नाही . मी गेलो तर धौंशा लावूनच येईल .
०बाळगणे   भीति , धाक , धोसरा वाटणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP