Dictionaries | References

न पडती चित्रा, तर भात न मिळे पितरा

   
Script: Devanagari

न पडती चित्रा, तर भात न मिळे पितरा

   चित्रांचा पाऊस पडला नाहीं तर पितरांस पिंड द्यावयासहि भात मिळणार नाहीं, इतका दुष्काळ पडेल. याचे उलटहि, चित्ना नक्षत्राचा पाऊस वाईट अशीहि समजूत आहे. उदा० धाड पडावी पण चित्रा न पडावी. कदाचित्‍ उत्तराबद्दल चित्रा शब्द येऊन ही म्हण बनली असावी. किंवा एक कोंकणांत व एक देशावर पिकांच्या मानानें रुढ असावी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP