|
नकल , नकली , नकल्या इ० पहा . स्त्री. १ एखादा लेख , दस्तऐवज इ० कांची बरहुकूम केलेली प्रत ; मूळ प्रतीवरुन केलेली , तिच्या बरहुकूम दुसरी प्रत . २ कोणत्याहि वस्तूबरहुकूम केलेली प्रतिकृति , आवृत्ति , प्रतिमा . सरकारी कॉलेजच्या नकला होऊन राहिलेल्या कॉलेजांस ... - टि ३ . ३५ . ३ ( एखाद्याच्या ) भाषण - वर्तनादि प्रकारांचे केलेले हुबेहुब अनुकरण ; कित्ता . ४ हास्यकारक , चमत्कृतिजनक , गमतीची गोष्ट इ० आज देवालयांत मोठी नकल झाली . ५ पहिली , मूळ प्रत . दगडावर जी नकल छापावी तिच्यासारख्या सार्या नकला निघतात . ६ ( नाट्य ) नाटकांत पात्राने बोलावयाचे भाषण . माझी नक्कल पाठ आहे . - स्त्रीन . ( एखादा राजवंश , कुटुंब इ० कांचा झालेला ) समूळ नाश ; नामशेष होणे ; निर्वंश ; फक्त कथेच्या रुपाने , इतिहासांत अवशिष्ट राहणे . संवस्थान देवदुर्ग व किलीच नाईक याजकडे होते त्यास त्याचे नकल जाहाले . - वाडसमा २ . ११५ . कित्येकांची घरे बसली , कित्येकांच्या नकला जाहल्या . - पाब ४९ . त्या राजाची नकल झाली . [ अर . नक्ल ] ०नविशी निशी स्त्री . नकलनवीसाचा हुद्दा , काम . [ फा . नक्ल + नवीस ] ०नवीस नीस पु . लेख , कागदपत्र इ० कांच्या नकला , प्रती करणारा कारकून . [ फा . नक्ल + नवीस ]
|