|
वि. नऊ . नऊ संख्या . हे नवरत्नमाळा गोमटी । जो घाली सद्गुरुच्या कंठी । - एभा १० . २३८ . [ सं . नव ; गुज . नव ; झें . नवन ; ग्री . एन्नेअ ; लॅ . नोव्हेम ; गॉ . निउन ; अँसॅ . निगन , प्राज . निउन ; अज . नेउन ; प्राप्र . नेविन्त्स ; स्लॅ . देवन्ति ; लिथु - देव्यन्ति ; हिब्रयू ; नओइ ; कँब्रि - नव ] अ. ( काव्य . ) न ; नच ; नये . गो - धनी बहु पुढे नव जावे । ठाव एकचि धरुनि थिजावे । - वामन - वेणुसुधा २२ . - मुवन १ . १२ . - सारुह २ . १३ . [ सं . न वै , नैव ; प्रा . णवि ] वि. १ नवीन ; नवे ; नूतन . नव नव नवल कराया न धरी लेशहि इचीच आळस भा । - मोसभा १ . १० . या नव नवल नयनोत्सवा । - मनापमान २ कोमल ; चिमुकले ; लहान . श्याम चतुर्भुज मुकुट कुंडले । सुंदर दंडले नव बाळ । - तुगा ४२४० . [ सं . नव . झें . नव ; ग्री . नेऑस ; लॅ . नोवुस ; ऑस्क . नुवल ; अँसॅ . निवे , निव ; गॉ . निउयिस ; लिथु . नौयेस ; स्लॅ . नोवु ; हिब्रयू . नुअ . ] ०कुलुपांचे - न . लढाऊ गलबत . विलायत जंजिरा नवकुलुपांचे तारु । - विवि ८ . ३ . ५४ . ०कीर्द स्त्री. प्रथम लागवड . नवकीर्दीस कोठे कोठे नांगरीत होते ते काम सोडून या धंद्यास लागले . - ख ९५९ . - वि . नवीनच लागवडीस आणलेली ( जमीन ). [ नव + फा . कीर्द ; फा . नौकीर्द ] ०खरीद वि. नव्याने खरेदी केलेले . तारुं - न . लढाऊ गलबत . विलायत जंजिरा नवकुलुपांचे तारु । - विवि ८ . ३ . ५४ . ०तुकड्यांची - स्त्री . नऊ तुकडे जोडून केलेली चोळी ; इच्या उलट अखंड चोळी , तीन तुकड्यांची चोळी . म्ह ० नवव्या दिवशी नवी विद्या . सामाशब्द - ०गंध पु. नवीन , ताजा सुवास . ०घड वि. नवीन घडलेले ; नवट ( भांडे ). [ नव + घडणे ] चोळी - स्त्री . नऊ तुकडे जोडून केलेली चोळी ; इच्या उलट अखंड चोळी , तीन तुकड्यांची चोळी . म्ह ० नवव्या दिवशी नवी विद्या . सामाशब्द - ०कोट , कोटी - पु . १ कोट्याधीश ; अतिशय श्रीमंत मनुष्य . पण हे विचारांचे नवकोटनारायण आचाराच्या बाबतीत मात्र सुदाम्यापेक्षा दरिद्री असतात . - प्रेम २१ . १ ( विपरीत लक्षणेने ) अतिशय दरिद्री ; कंगाल मनुष्य . - शास्त्रीको . [ नव + कोट + नारायण ] ०चांद पु. १ अमावस्येनंतर नवीनच , प्रथम दिसणारा चंद्र ; शुद्ध द्वितीयेचा चंद्र . २ अमावस्या ( इं . ) न्यू मून . [ नव + चांद = चंद्र ] ०जवान वि. १ तरुण ; ज्वानीत आलेला . २ अनभिज्ञ ; नेणता ; अजाण . बहुतकरुन सर्व नवजवान आहेत . - रा ५ . ५४ . [ नव + फा . जवान = तरुण ; फा . नवजवान ] नारायण , कोटी - पु . १ कोट्याधीश ; अतिशय श्रीमंत मनुष्य . पण हे विचारांचे नवकोटनारायण आचाराच्या बाबतीत मात्र सुदाम्यापेक्षा दरिद्री असतात . - प्रेम २१ . १ ( विपरीत लक्षणेने ) अतिशय दरिद्री ; कंगाल मनुष्य . - शास्त्रीको . [ नव + कोट + नारायण ] ०जवानी स्त्री. १ तारुण्य ; नवयौवन ; ज्वानी . २ नेणतेपणा ; अजाणपणा . तत्रापि नवजवानी आहे . कोणेसमयी काय करीक कळत नाही . - ख ८ . ३९२६ . [ नवजवान ] ०कोटी , कोटी कात्यायेणी , कोटी कात्यायनीचामुंडा - स्त्रीअव . नऊ कोट देवी , कात्यायनी , चामुंडा . नवकोटी कात्यायेणीचा विचार । पिंडी कोठे । - दा ९ . ५ . ३१ . पहावया श्रीकृष्णाचे लग्न । सकळ दैवते निघाली सांवरोन । नवकोट चामुंडा संपूर्ण । चालती तेधवां । - ह २४ . १०५ . [ नव + कोटी + कात्यायनी , चामुंडा ] कात्यायनी , कोटी कात्यायेणी , कोटी कात्यायनीचामुंडा - स्त्रीअव . नऊ कोट देवी , कात्यायनी , चामुंडा . नवकोटी कात्यायेणीचा विचार । पिंडी कोठे । - दा ९ . ५ . ३१ . पहावया श्रीकृष्णाचे लग्न । सकळ दैवते निघाली सांवरोन । नवकोट चामुंडा संपूर्ण । चालती तेधवां । - ह २४ . १०५ . [ नव + कोटी + कात्यायनी , चामुंडा ] ०जीवन न. १ पुनर्जन्म . २ चरित्राचे , आयुष्यक्रमाचे पालटलेले स्वरुप ; नवचैतन्य ; नवी उमेद ; स्फूर्ति . [ नव + सं . जीवन ] नवतर , नवेतर वि . अलीकडील ; अलीकडचा ; नवा . - क्रिवि . अलीकडे ; अस्तित्वांत आलेला ; अलीकडील काळांतील . - क्रिवि . अलीकडे ; नव्याने नुकतेच कांही दिवसांपूर्वी . सूर्याला दुसरी स्थलांतर करण्याची गति असून तिने सूर्यमाला शौरिनामक पुंजाकडे जात असते असे डॉक्टर हर्शल ह्यास नवथर आढळलेले आहे . - सूर्य ३९ . पण त्या नवथरच इकडे आल्या असल्यामुळे कोणाशीही विशेष सलगीने बोलणे त्यांना शक्य नव्हते . - नपुक २६ . [ नव + थर ] नवथळ पुस्त्री . ( ना . व . ) तरुण पिढी ; तरुण मंडळी . [ नवथर ] ०दिगर नौदिगर - न . १ ( सरकारी अंमलदारांत रुढ ) अनिष्ट फेरबदल ; भांडणाला व हुकूम , करार मोडण्याला प्रवृत्त होणे ; वितंडवाद ; विरोध ; हरकत ; तक्रार . ( क्रि० करणे ; लावणे ; मांडणे ; घडणे ; पडणे ). करार जाहला असतां त्यास नवदिगर करावे म्हणावे हे कसे घडेल . - रा ३ . २०६ . २ ( केलेला ) ठराव , करार इ० नाकबूल करणे ; ( त्याबाबत ) बदलून जाणे ; भलतेसलते , कमजास्त बोलणे . कांही नौदिगर करुन बिघाड करुं म्हणाल तर आम्ही तुमचे रफीक नाही . - रा १ . ५२ . ह्यांत आम्ही नवदिगर केल्यास सरकारचे गुन्हेगार होऊं . ३ ( क्व . ) - वि . नाकबूल ; बेइमान . मी ऐकेनच ऐकेन , नवदिगर व्हावयाचा नाही . [ फा . नव = नवीन + फा . दिगर = दुसरे , इतर ] ०कोण पु. ( भूमिति ) नऊ कोपरे असलेली व नऊ बाजूंना मर्यादित आकृति . - वि . नऊ कोपरे असलेली . [ नव + सं . कोण ] ०दौलत्या वि. नुकताच , नव्यानेच श्रीमंत झालेला , वैभवास चढलेला ; अधव्याचा , उपटसुंभ श्रीमंत . [ नव + दौलत ] ०खंड खंडे नअव . १ पृथ्वीच्या नऊ खंडांचा समुदाय . इलावृत्त , भद्राश्व , हरिवर्ष , किंपुरुष , केतुमाल , रम्यक , भरत , हिरण्मय व उत्तरकुरु ही नवखंडे होत . दुसरेहि पाठभेद आहेत . ( अ ) भरत , वर्त्त ?, राम ?, द्रामाळ ( द्रमिल , द्रामिल ? ), केतुमाल , हिरे ( हीरक ? ), विधिवस ?, महि आणि सुवर्ण . ( आ ) इंद्र , कशेरु , ताम्र , गभस्ति , नाग , वारुण , सौम्य , ब्रह्म , भरत हे नऊ भाग . - हंको . नवखंडे सप्तद्वीपे । छपन्नदेशींच्या रायांची स्वरुपे । - ह २८ . ६४ . [ नव + सं . खंड = तुकडा , पृथ्वीचा भाग ] ०खंड - स्त्री . जीत नऊ खंडे आहेत अशी पृथ्वी . खणी - वि . नऊ खणांची . दुखणी काय नवखणी माडी नलगे धरा नखेंदु खणी । - मोकृष्ण ८३ . १३ . लावण्याची सकळ संपदा सहज उभी नवखणी । - पला ४ . ३४ . [ नव + खण ] ०धान्य न. १ नवे धान्य , दाणा गोटा . २ ( राजा . ) दरवर्षी पिकणार्या नवीन धान्याच्या भक्षणाचा संस्कार ; कुळाचार . ३ तांदुळाची एक जात . [ नव + धान्य ] ०नवती स्त्री. तारुण्याची आरंभदशा ; यौवनारंभ ; मुसमुसणारे यौवन . नवनवती आली रसा . [ नव + नवती = तारुण्य ] पृथ्वी - स्त्री . जीत नऊ खंडे आहेत अशी पृथ्वी . खणी - वि . नऊ खणांची . दुखणी काय नवखणी माडी नलगे धरा नखेंदु खणी । - मोकृष्ण ८३ . १३ . लावण्याची सकळ संपदा सहज उभी नवखणी । - पला ४ . ३४ . [ नव + खण ] ०गजी पुस्त्री . १ ( नऊ गजी ) नऊ गज लांबीचा सोपा . राजदरबारचा भव्य दिवाणखाना ; कचेरी ; सदर . राजा नवगजीत बैसला । - ऐपो १७ . २ तंबू ; डेरा . बाडे सुंदर खाबगे नवगज्या सिद्धाच होत्या घरी । - सारुह ३ . ४५ . तमाम येउनु नऊ गजी आसपास युऊनु उतरीले - इमं ७ . नवगोजी पहा . [ नव + गज = एक परिमाण ] ०निगादास्त नौनिगादास्त - स्त्री . १ नवी फौजबंदी , फौजभरती ; नवीन ठेवलेली फौज . परंतु प्रस्तुत नौनिगादास्त करीत आहेत . - रा १ . ५६ . नवनिगादास्त्रीचे लोक त्रिकूट . - रा ७ . ७१ . २ तयारी . [ फा . नव + निगादास्त ] ०गुण पुअव . बुद्धि , सुख , दुःख , प्रयत्न , इच्छा द्वेष , संस्कार , पुण्य व पाप असे न्यायशास्त्रांत सांगितलेले नऊ गुण . बुद्धि सुख दुःख प्रयत्न । इच्छा द्वेष संस्कारण । पुण्य पाप नवगुण । बोलिजेती । - विउ ३ . ४ . - वि . नऊपट . ०निशत निशित वि . नुकतीच , नवीन धार लावून तीक्ष्ण केलेला ; नवीनच पाजविलेला , परजलेला . देवा नवनिशती शरी । वावरोनि यांच्या जिव्हारी । - ज्ञा २ . ४८ . [ नव + सं . निशित = तीक्ष्ण ] ०गुण नऊ दोर्यांचे ( यज्ञोपवीत इ० ). नऊ फेर्यांचे . नवगुण तव कंठी ब्रह्मसूत्र प्रभा जे । - मुरा बालकांड ११३ . [ नव + सं . गुण = दोरा ] ०पंकज - स्त्री . ताज्या , नव्या कमलांची माळ . कपटनागर सुंदर बाळिका । करयुगी नवपंकज माळिका । - मुराअरण्यकांड २१ . [ नव + सं . पंकज = कमल + सं . मालिका = माळ ] ०गोजी पु. डेरा . शामियाना . उतर तर्फेसी नवगोजी देऊनु उतरिले . - इमं ७ . माळिका - स्त्री . ताज्या , नव्या कमलांची माळ . कपटनागर सुंदर बाळिका । करयुगी नवपंकज माळिका । - मुराअरण्यकांड २१ . [ नव + सं . पंकज = कमल + सं . मालिका = माळ ] ०ग्रह पुअव . १ सूर्य , चंद्र , मंगळ , बुध , गुरु , शुक्र , शनि , राहू व केतु हे नऊ ग्रह . २ ( उप . निंदार्थी ) जूट ; टोळके ; टोळी ; कंपू . ३ - न . मंगलकार्यारंभी करतात ती नऊ ग्रहांची पूजा ; ग्रहमख . दोन्ही घरी नवग्रहे झाली । देवदेवके पूजिली । - कालिका १६ . ४१ . [ नव + ग्रह ] ०पाषाणयुग न. ( भूशास्त्र ) अत्यंत प्राचीन पाषाणयुगाचा उत्तरार्ध ; ( इं . ) निऑलिथिक एज . [ नव + पाषाण = दगड + युग ] ०पुसती पुस्ती - स्त्री . नवे लेखन . पुनरपि मार्गी काढी जे धर्मरहस्य जेवि नवपुसती । - मोवन १३ . ७० . [ नव + म . पुस्ती ] ०चंडी स्त्री. १ देवाची नवचंडी करीन . - रत्न १ . ३ . २ नवरात्र ; नवरात्र पहा . [ नव + सं . चंडी = देवी ] ०भक्त वि. १ नव्या गोष्टींचा शोकीन . २ नवीन देवाचा भक्त ? नुकतेच धर्मांतर केलेला , बाडगा , बाटलेला या अर्थी चुकीने रुढ . [ नव + सं . भक्त = भजणारा , आवड नसणारा ] ०छिद्रे नअव . नवद्वारे पहा . ०यौवना स्त्री. नवतरुणी ; तारुण्यकलिका ; तारुण्याच्या भरांत आलेली स्त्री . [ नव + सं . यौवन = तारुण्य ] ०जणी स्त्रीअव . १ नऊ स्त्रिया . २ ( ल . ) नवविधाभक्ति . अत्यंत शहाण्या सुवासिनी । आणिक आल्या नवजणी । कृष्णाची खुतखावणी । त्या जाणोनि वर्तती । - एरुस्व १६ . ४६ . ०ज्वर पु. दूषित तापाचा एक अतिशय तीव्र प्रकार ; हा ताप नऊ दिवसांच्या मुदतीचा व प्रायः घातुक असतो . [ नव + सं . ज्वर = ताप ] ०रंगडा वि. नित्य नवा रंग , तर्हा करणारा . नवरसांचा रसिक । नवरंगडा मीच एक । - एभा १२ . १९७ . [ नव + रंग ] ०टके न. शेराच्या अष्टमांशाचे , ( कैली ) अर्ध्या पावशेराचे माप . [ नऊ + टांक ] ०रान न. नुकतीच , प्रथमच लागवडीस आणलेली जमीन . [ नव + म . रान ] ०टांक न. अदपावचे वजन . नवटके पहा . [ नव + टांक ; गुज . नवटांक ; गो . नवटांग ] ०रोज नौरोज - पु . १ नवीन वर्षाचा आरंभदिन . २ पारशांची वर्षप्रतिपदा . ३ मोंगल बादशाह आपल्या राज्यारोहण दिनापासून जो नवीन जुलुस सन सुरु करीत त्याच्या आरंभीचा दिवस . ४ जुलुस सनाच्या आरंभीच्या दिवशी करावयाचा उत्सव , समारंभ वगैरे . अकबराने ज्या वेळी आपला दिन ई इलाही नांवाचा नवीन धर्म प्रचारांत आणला त्यावेळी नवरोजचा सण सुरु केला . - ज्ञाको ( न ) ३८ . [ फा . नवरोझ ] ०वधू स्त्री. नुकतेच लग्न झालेली मुलगी ; नवी नवरी , नववधू प्रिया मी बावरते । - तांबे [ सं . नव + सं . वधू ] ०द्वारे नअव . दोन डोळे , दोन कान , दोन नाकपुड्या , तोंड , गुदद्बार व मूत्रद्वार अशी मानवी शरीराची नऊ द्वारे , छिद्रे . नवद्वारे देही । तो असतुचि परि नाही । - ज्ञा ५ . ७५ . ०नाग पुअव . १ पुराणांतरी वर्णिलेली अनंत , वासुकी , शेष , पद्मनाभ , कंबल , शंखपाल , धृतराष्ट्र , तक्षक व कालिया ह्या नावांचे नऊ नाग , सर्प . २ नऊ हत्ती . [ नव + सं . नाग = सर्प , हत्ती ] ०विद्वेषी वि. पुराणप्रिय ; सनातनी ; सुधारणेचा द्वेष करणारा . सुधारक आणि नवद्वेषी असे समाजामध्ये दोन पक्ष उत्पन्न होऊन ... - टि १ . ३४० . [ नव + सं . विद्वेषी = द्वेष करणारा ] ०शिका शिखा - वि . १ नुकताच शिकूं लागलेला ; ( एखाद्या ) व्यवहारांत , धंद्यात नुकताच पडलेला ; नवखा . २ ( कु . ) प्रथमच गरोदर झालेली ( स्त्री , जनावर ); प्रथमतः लागास आलेले , फळ धरणारे ( फणस इ० झाड ). ३ अद्भुत ; विलक्षण ; असाधारण ; अपूर्व . [ नव + शिकणे ] ०नाग - वि . नऊ हजार हत्तींचे बळ असलेला [ नव + सं . नाग = हत्ती + बळी = बलवान ] सहस्त्रबळी - वि . नऊ हजार हत्तींचे बळ असलेला [ नव + सं . नाग = हत्ती + बळी = बलवान ] ०शीक शीख - वि . नुकताच शिकूं लागलेला ; नवशिका अर्थ १ पहा . [ नव + शिकणे ] सर - वि . नवीन ; अलीकडचा . - क्रिवि . अलीकडे ; नुकतेच ; थोड्या दिवसांपूर्वी . नवथर पहा . [ नव + सं . सदृश ] ०सरणी सारणी - स्त्री . दुरुस्त करणे ; नवा दिसेलसा करणे . [ नवसरणे ] ०नागसहस्त्रशक्ति स्त्री. नऊ हजार हत्तींचे बळ . आंगी जियेस नवनागसहस्त्रशक्ती । - आपू ३९ . [ नव + सं . नाग = हत्ती + सं . सहस्त्र = हजार + सं . शक्ति = बळ ] ०नागोर्या पु. ( ना . ) चेंडूगोर्यांचा खेळ . ०हिंदु वि. ( गो . ) पुन्हां हिंदुधर्मात आलेला ; धर्मांतर केलेला ( हिंदु ); शुद्धीकरण होऊन हिंदु झालेला . पणजी येथील न्यायाधिशाने नव हिंदूंनी जन्मनोंदणीची नोंद न केल्यामुळे खटले भरले . - के २ , १२ . ३० . [ नव + हिंदु ] नवांकित पु . नवीनच दीक्षा दिलेला शिष्य . विश्वनाथ नामा पंडित । खंडित ज्ञानी अखंडित । आशंका खंडोनिया नवांकित । प्रेरिला अंकित उत्तरपंथे । - सप्र १० . २९ . [ नव + सं . अंकित ] नवान्न न . नवधान्य सर्व अर्थी पहा . [ नव + अन्न ] ०नाथ पुअव . मच्छिंद्र , गोरक्ष , जालिंदर , कानीफा , चरपटी , नागेश , भरत , रेवण व गहिनी . हे नवनारायणाचे अवतार मानतात . प्रकाश , विमर्श , आनंद , ज्ञान , सत्यानंद , पूर्णानंद , स्वभावानंद , प्रतिभावानंद व सुभगानंद असाहि पाठभेद आहे . - नव १ . ३९ ते ४३ . - ज्ञाको ( न ) ३७ . ०पूर्णिमा स्त्री. नवे धान्य खाण्यास सुरवात करण्याचा दिवस . हा प्रायः कोंकणात आश्विन शु . १५ व देशांत माघ शु . १५ हा असतो . कोंकणात तांदूळ व देशांत गहू ही मुख्य असल्याने कोंकणात व देशांत वर सांगितलेल्या भिन्न भिन्न तिथींना हा कुळधर्म केला जातो . अन्यत्र नवी , नवे पहा . [ नवान्न + सं . पूर्णिसा ] नवोढा स्त्री . १ नवीन लग्न झालेली , नवपरिणीत स्त्री ; नववधू . सुंदर वनिता प्रिया नवोढा । - अमृत ५२ . २ अनुपभुक्त स्त्री ; अक्षतयोनि ; लग्न होऊन अद्याप पुरुषप्राप्ति न झालेली स्त्री . [ नव = नव्याने + सं . ऊढ = विवाहित ] ०नारायण कवि , हरि , अंतरिक्ष , प्रबुद्ध , पिप्पलायन , आविहोत्र , द्रुमिल , चमस , व जरभाजन . - नव १ . २९ . ते ३० . ०नारीकुंजर पु. नऊ स्त्रियांनी आपल्या शरीरास निरनिराळ्या प्रकारे पीळ व मुरड देऊन ( कृष्णाच्या उपयोगासाठी ) बनविलेली हत्तीची आकृति . [ नव + सं . नारी = स्त्री + सं . कुंजर = हत्ती ] ०निधि निधी - पुअव . कुबेराचे नऊ खजिने . त्यांची नावेः - महापद्म , पद्म , शंख , मकर , कच्छप , मुकुंद , कुंद , नील आणि खर्व . मोल तुमचिया या श्रीचरणरजाचे न होय निधिनवही । - मोमंभा १ . ११२ . [ नव + सं . निधी = सांठा ] ०महाद्वारे नअव . नवद्वारे पहा . ०महारोग पुअव . राजयक्ष्मा , कुष्ट , रक्तिपिती , उन्माद , श्वास , मधुमेह , भगंदर , उदर व मूतखडा हे नऊ दुर्धर व भयंकर रोग . [ नव + सं . महारोग = मोठा , भयंकर रोग ] ०रंगी वि. नऊ रंगांनी युक्त ( पदार्थ ). ०रत्नराजमृगांक पु. ( वैद्यक ) एक औषधी रसायन . [ नव + रत्न + राजन + मृग = हरिण + अंक = चिन्ह ] ०रत्ने नअव . हिरा , माणिक , मोती , गोमेद , इंद्रनील , पाच , प्रवाळ , पुष्कराज , वैडूर्य किंवा तोर्मल्ली ही नऊ प्रकारची रत्ने नवरत्नांची आंगठी . ०रत्नांचा - पु . स्त्रियांचा गळ्यांत घालण्याचा एक बहुमोल हार . हार - पु . स्त्रियांचा गळ्यांत घालण्याचा एक बहुमोल हार . ०रस पुअव . ( साहित्य ) साहित्यशास्त्रांत वर्णिलेले श्रृंगार , वीर , करुण , अद्भुत , हास्य , भयानक , बीभत्स , रौद्र आणि शांत या नांवांचे नऊ रस . जी दैविकी उदार वाचा । जै उद्देशु दे नाभिकाराचा । तै नवरससुधाब्धीचा । थावो लाभे । - ज्ञा १० . ७ . ज्ञाता जो सरसावला , नवरसां - माझारि शृंगारसा । - र ५ . [ नव + सं . रस ] ०रसिक वि. चलाख ; तरतरीत ; आवेशयुक्त ; नऊ रसांनी भरलेले , पूर्ण ( गान , कवन , कथा , वर्णन , ग्रंथ , श्लोक , गवई , कवि , वक्ता इ० ). [ नवरस ] ०रात्र न. १ ( सामा . ) नऊ अहोरात्रांचा समुदाय . २ ( विशेषर्थाने ) चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंतचा काल ( रामाचे नवरात्र ); तसेच आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंतचा नऊ दिवसांचा काल ( देवीचे नवरात्र ) यास शारदीय नवरात्र असे म्हणतात व हेच अधिक रुढ आहे . मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून चंपाष्ठीपर्यंत सहा दिवस खंडोबाचे नवरात्र असते . ३ वरील कालांत करतात तो देवाचा , देवीचा उत्सव , पूजा . [ नव + सं . रात्रि = रात्र ] ०लख वि. ( काव्य ) नऊ लक्ष . आकाशांत नवलख तारे आहेत . [ नव + लक्ष = शंभर हजार ] ०लक्षणे नअव . आचार , विनय , विद्या , प्रतिष्ठा , तीर्थदर्शन , निष्ठा वेदपठन , तपस्या व दान ही ब्राह्मणाची नऊ लक्षणे . - शर . लाखा ख्या वि . ज्याच्याजवळ नऊ लक्ष रुपये आहेत असा ; लक्षाधीश ; अतिशय श्रीमंत . आपुल्या तुम्ही घरचे नवलाखे मिजाजी । - प्रला १७५ . [ नव + लाख = शंभर हजार ] ०विध वि. नऊ प्रकारचे . [ नव + सं . विधा = प्रकार , भेद ] ०विध - न . नवविधा भक्ति पहा . नवविधभजन घडो । तुझिये स्वरुपे प्रीति जडो । भजन - न . नवविधा भक्ति पहा . नवविधभजन घडो । तुझिये स्वरुपे प्रीति जडो । ०विध - नअव . नवरत्ने पहा . रत्ने - नअव . नवरत्ने पहा . ०विधा - स्त्री . श्रवण = ईश्वराचे गुणवर्णन , चरित्रे इ० ऐकणे ; कीर्तन = ईश्वराचे चरित्र वर्णन करणे , वाचणे ; स्मरण = ईश्वराचे गुण , चरित्र इ० आठवणे ; पादसेवन = ईश्वराचे पाय धुणे , चेपणे इ० सेवा ; अर्चन = पूजा करणे ; वंदन = नमस्कार करणे ; दास्य = चाकरी करणे ; सख्य = ईश्वराशी सलगी करणे ; आत्मनिवेदन = ममत्व सोडून ईश्वरास सर्वस्व , स्वतःला अर्पण करणे . या नऊ प्रकारांनी करावयाची ईश्वराची भक्ति . श्रवण कीर्तन स्मरण । पादसेवन अर्चन वंदन । दास्य सख्य आत्मनिवेदन । हे भक्ति नवविधा पै । - विपू ५ . २३ . - दा १ . १ . ३ . [ सं . नवविधा = नऊ प्रकारची + भक्ति = सेवा ] भक्ति - स्त्री . श्रवण = ईश्वराचे गुणवर्णन , चरित्रे इ० ऐकणे ; कीर्तन = ईश्वराचे चरित्र वर्णन करणे , वाचणे ; स्मरण = ईश्वराचे गुण , चरित्र इ० आठवणे ; पादसेवन = ईश्वराचे पाय धुणे , चेपणे इ० सेवा ; अर्चन = पूजा करणे ; वंदन = नमस्कार करणे ; दास्य = चाकरी करणे ; सख्य = ईश्वराशी सलगी करणे ; आत्मनिवेदन = ममत्व सोडून ईश्वरास सर्वस्व , स्वतःला अर्पण करणे . या नऊ प्रकारांनी करावयाची ईश्वराची भक्ति . श्रवण कीर्तन स्मरण । पादसेवन अर्चन वंदन । दास्य सख्य आत्मनिवेदन । हे भक्ति नवविधा पै । - विपू ५ . २३ . - दा १ . १ . ३ . [ सं . नवविधा = नऊ प्रकारची + भक्ति = सेवा ] ०सर वि. नऊ सरांचा ( हार इ० ). [ नव + सर ] ०सुती स्त्री. जानवे करण्यासाठी नऊ पदरी वळून केलेला दोरा . [ नव + सूत = दोरा ] नवांकित वि . पुठ्ठ्यावर नवाच्या आंकड्याने चिन्हित ( घोडा ). [ नव + सं . अंकित = चिन्हाने युक्त ] नवास्त्र वि . नवकोण पहा . [ नव + सं . अस्त्र = कोण , कोपरा ]
|