पु. - शेतीची जमीन उकरण्याचे लोखंडी फाळ असलेले औत ; जोत ; हल . करी घेतला नागरु । - उषा १४१ .
- नांगरखुंटा .
- गलबत स्थिर करण्यासाठी पाण्यांत टाकण्याचा सांखळीने बांधलेला लोखंडी मोठा , वजनदार आंकडा , गळ . यासारखे इतर साधन . साध्या होड्यांना नांगर म्हणजे एक दोरी लावलेला दगड असतो .
- ( ल . ) जाड टांकाची लेखणी ; फणीचा जाड दांता ; खुंट . [ सं . लांगल ; प्रा . णंगर ; सिं . लंगरु ; हिं . गु . लंगर ; पं . नंगल , लंगल ; का . नेगल ; फ्रेंजि . ननरी ] ( वाप्र . )
०उचलणे, टाकणे, सोडणे शेतकाम सोडणे . ( जुलुमामुळे वगैरे ). ( अमक्यावर )
०धरणे जुलूम करणे .
०की स्त्री. नांगरणे ; नांगरण्याचा व्यापार .
०खुंट न. - ज्यांत फाळ बसविला जातो तो लांकडाचा ठोकळा .
- नांगर . - बदलापूर २८६ .
०चिनी स्त्री. ( बे . ) रानांत आपोआप होणारे रताळे .
०जोत न. - गांवच्या खोताला वेठ चाकरीच्या हक्काबद्दल दिलेली वस्तु ; अर्धेलीने खोताच्या नांगरास दोन बैल व एक मनुष्य एक किंवा अधिक दिवसपर्यंत देणे ; खोताच्या उपयोगासाठी दिलेली
- ( कर . ) नांगरण्याची मजुरी .
- नांगरण्याची क्रिया . -
०डा, नांगारदो पु. ( माण . हेट . कु . ) नांगराचा जूं बांधण्याचा दोर .
०णी स्त्री. - नांगरकी .
- जहाज नांगरणे ; नांगर टाकून गलबत थांबविणे .
०णी, दुणणी स्त्री. पुन्हां पुन्हां नांगरणे ; आडवे उणे नांगरणे .
०णे स.क्रि. - नांगराने शेत उकरणे .
- नांगर पाण्यांत सोडून गलबत थांबविणे .
- ( ल . ) त्रास देणे ; काळीज खणून दुखविणे .
- ( कों . ) कुदळीने खणणे .
- आडवे उभे नांगरणे ; पुन्हां पुन्हां नांगरणे .
दुणणे स.क्रि. आडवे उभे नांगरणे ; पुन्हां पुन्हां नांगरणे .
०दांत पु. नांगराचा फाळ . सवेचि परतावया पाहत । पायी घातला नांगरदांत । - एरुस्व १० . ५० .
०पंचमी स्त्री. ( अशिष्ट ) नागपंचमी . या दिवशी नांगरणे बंद असते .
०पट्टी स्त्री. दरेक नांगरावरचा सरकारी कर .
०बंदी स्त्री. जमीनीऐवजी चालू असलेल्या नांगरावर पट्टी बसविण्याची रीत ; शेतकर्यास त्याच्या इच्छेप्रमाणे लागवड करुं देणे .
०मोड्या वि. ( निंदार्थी ) नांगर्या ; शेतकरी .
०रान न. - नांगरलेली जमीन .
- जिराईत ; काळी जमीन .
०वट, वठ, वठी स्त्री. नांगरलेली जमीन .
०वाडा पु. - ( गलबताचे ) नांगर टाकण्याचे स्थान ; बंदर .
- बलबताचा नांगर टाकणे ; गलबत नांगरणे .
०वाळा पु. ( बे . ) फाळाची कडी ; जानवे अर्थ ४ पहा . [ नांगर + वाळा ]
नांगरास पाळ ( नांगरतांना एखादे झाडाचे मूळ आडवे आल्यास नांगर अडतो त्यावरुन )
दिरंगाई लावण्यास , रेंगाळण्यास कांही तरी क्षुद्र कारण पहाणे ;
एखाद्याला त्याच्या शब्दांत पकडणे .
म्ह ० जेथे जावे तेथे नांगरास पाळ .०वेठ स्त्री. कुळाकडून वेठीने शेत नांगरुन घेणे ; सरकारी किंवा सरकारी अधिकार्यांची जमीन मजुरी न देतां नांगरुन घेणे . नांगरजोत पहा .
०जोत वि. नांगरलेली ( जमीन ).
नांगरी स्त्री. लहान नांगर .
नांगरे कोनफळ , नांगर्ये न. ( कों . ) एक प्रकारचे कोनफळ किंवा गोरांडू . नांगरचिनी पहा .
नांगर्या वि. - नांगरण्याच्या कामांत पडलेला ; नांगरासंबंधी ; नांगरांस
लावलेला ( माणूस , पशु ).
- ( ल . ) खेडवळ ; गांवढळ .
- शेतकाम
करण्यासारख्या वयाचा ( गडी ).
- वडील ; पुढारी ( कुटुंब , कुळ , जाती
, समाजांतील ).
- पाटीलकीचा अधिकार असलेला .
- तिरस्काराने वणजारी
लोकांस म्हणतात .
नांगर्या ऊंस पु. जमीन नांगरीत असतां नांगराने पडलेल्या सरीत कांडे खोवून लागण केलेला ऊंस - कृषि ४५६ .
नांगोर पु. ( अप . ) नांगर .