Dictionaries | References

निपटणे

   
Script: Devanagari
See also:  निपटणा

निपटणे

 क्रि.  खरडून काढणे , घासणे , धुऊन टाकणे , पुसणे , पुसून काढणे ;
 क्रि.  आटपणे , उरकणे , संपवणे ( उरलेले काम ;)
 क्रि.  उतार पडणे , कमी होणे , निघून जाणे .

निपटणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  नाहीसे करणे   Ex. केस न वाढू देता तो मुळातच निपटावा.
 verb  द्रवपदार्थ निःषेश होईल असे काढणे   Ex. मिशीवरील पाणी त्यानी बोटांनी निपटले.
   See : संपणे, संपवणे

निपटणे

  न. शेवटचे मूल . मातेसि आवडे निपटणे । तेवी उद्धव वृद्धपणीचे तान्हे । - एभा २८ . ६९९ .
   विक्रिवि . १ ( काव्य . ) निवळ ; बरोबर ; नेमका ; योग्य ; केवळ . २ निःशेष ; पूर्णपणे ; सर्वथा . आतां यावरी जे बोलणे । ते येणेचि बोले शहाणे । जे मौनाचेहि निपटणे । पिऊनि गेले । - अमृ ५ . ५३ . [ निपट ]
 स.क्रि.  १ खरडून काढणे ; ( हाताने किंवा बोटांनी द्रवपदार्थ ) पुसणे ; धुणे ; घासणे किंवा पुसून काढणे . जमीन इ० वरुन ओलसर किंवा पातळ पदार्थ निःशेष होईल असा हाताने काढणे . हे शेण निपटून भर . २ निपटून टाकणे ; किंवा उपहास करुन गप बसविणे , निरुत्तर करणे ; निरानिपटा करणे ; संपविणे . ४ ( ल . ) कमी होणे ; उतार पडणे ; निघून जाणे ( ताप , आजार ). ५ पुसणे ; स्वच्छ करणे . हात निपटूनी मेदिनी - । वरी अंग घाली । - तुगा १५९ . ६ नाहीसे करणे ; झाडणे . आतां निपटुनि राज्यस्त्रीजीवितपुत्रकामना सोडा । - मोभीष्म ९ . १३ . [ निपट . हिं . निपटना ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP