-
पुस्त्री . आपलेंच म्हणणे धरून बसणें ; हट्ट ; आग्रह ; छंद ; नाद ; दुराग्रह ( क्रि० धरणें ; घेणें ; करणें ; चालविणें ). [ हेंकार - हेंच असें करणें ] आपला हेका करणें - आपलाच हट्ट चालविणें . हेकट , हेंकट , हेकड , हेंकड , हेंगटी , हेंगटी , हेकडवाईक , हेकडखोर , हेकलखोर , हेकाड , हेकेखोर , हेकेवाईक , हेकेबाज , हेकेकरी , हेंकाखोर , हेंकावाईक --- वि . आपल्याच हेक्यानें चालणारा ; हट्टी ; दुराग्रही ; एककल्ली ; छांदिष्ट . इंग्रजांचे खरे दोष प्रगट केले असतां आमच्या रेवरेंड बंधूस व इतर हेकडखोर लोकांस न आवडोत . - नि २०९ . म्ह० हेकड कुणबी सातदां राबी . हेकरी - स्त्री . हेका ; हट्ट . स्वधर्म भूमीपति हा न सोडी । तो आपली हेकरि हो न मोडी । - सारुह ८ . ३५ .
Site Search
Input language: