Dictionaries | References फ फांसेपारध्याचा कवडा Script: Devanagari Meaning Related Words फांसेपारध्याचा कवडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पशूंत जसा कोल्हा चलाख, तसा पक्ष्यांत कवडा चलाख समजला जातो व तो शिकारीलाहि कठीण असतो. फांसेपारधी रानांत जेव्हां कवडे पकडावयास जातो तेव्हां त्याच्याकडे एक पाळीव कवडा असतो. कवडयावर पुष्कळसे बंदुकीचे छरे फुकट घालविणें गरीब फासेपारध्यला कठीण असतें. तेव्हां त्यांना जिवंत पकडण्यासाठीं तो एक जाळें घेऊन जातो आणि जमिनीवर तें पसरुन आपला पाळीव कवडा त्याला अडकवून ठेवतो व आपण स्वतः लांब जाऊन बसतो. नंतर हा पाळीव कवडा ओरडून आपल्या जारभाईंना बोलावीत असतो. ते बिचारे आपल्या कोकटणार्या जातभाईकडे त्याची विचारपूस करण्यासाठीं म्हणून येतात पण जाळयांत बसतांच आंत गुरफटतात. अशा रीतीनें तो एक फसव्या कवडा ठरतो. -विविधवृत्त १४-७-४०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP