Dictionaries | References

बटकुरुं

   
Script: Devanagari
See also:  बटकरुं , बटकुर , बटकुरें , बटकुली , बटकूर

बटकुरुं     

नस्त्रीन .
( निंदार्थी ) बटीक ; दासी ; मोलकरीण .
 पु. बटकीशीं संभोग करणारा . [ बटीक ] बटिकरी , बटकी , बटीक - स्त्री . मूळची गरत असून पुढें व्यभिचारी झालेली स्त्री व तोच धंदा चालविणारी तिची मुलगी ; दासी ; मोलकरीण ; कुणबीण . आहेत कितव पुष्कळ , पुष्कळ त्यांच्या गृहांत बटकीही । - मोसभा ५ . ३३ . बटकीचा - पुअव . दासीपुत्र . ( ग्राम्य शिवी ). किती सांगों तरी न मानिती बटकीचे । - दावि ४५० . बटक्या , बटुकर्‍या , रा - पु . दासीशीं संभोग करणारा . म्ह० देव झाले लटकें ब्राह्मण झाले बटके . बटीक धंदा , काम - न . हलकासलका , दासपणाचा धंदा . बटीकपुरा - पु . गांवांतील दुराचरणी स्त्रियांची पेठ ; ( सिवराळपणें ) स्त्रियांचा जमाव . बटीकपोर - पु . बटकीचें मूल ( मुलगा , मुलगी ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP