Dictionaries | References ब बाळक Script: Devanagari See also: बाळ Meaning Related Words बाळक कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun जाणें निकतोच वा कांय वेळा पयलीं जल्म घेतला तें Ex. आयज ओश्पितालांनी बाळकांची चोरी सरसादारण गजाल जाल्या ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अर्भकWordnet:asmনৱজাত শিশু bdखुदिया benবাচ্চা gujનવજાત શિશુ hinबच्चा kanಎಳೆಮಗು kasزابَچہٕ malനവജാത ശിശു marअर्भक mniꯑꯉꯥꯡ nepनानी oriକଅଁଳାଛୁଆ panਬੱਚਾ sanशिशुः telపసిపిల్లలు urdنوزائیدہ , نوزائیدہ بچہ , شیرخواربچہ , ننھامنا , دودھ پیتابچہ , بچہ noun जल्मा पसून दोन वर्सांचें भुरगें Ex. आवयन आपल्या बाळकाक दुदाक धरलां ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmকেঁচুৱাশিশু bdगथसा gujબાળક hinबच्चा kanಮಗು malകുട്ടി marशिशू mniꯑꯉꯥꯡ nepनानी oriଛୁଆ panਬੱਚਾ sanशिशुः tamகுழந்தை urdبچہ , نونہال , لڑکا , منا , لاڈلا , پیارا See : भुरगें, अर्भक बाळक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A child. 2 m A boy. बाळक Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A child. m A boy. बाळक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. बालक ; लहान मूल . पु. मुलगा ; शिशु . जसा वारावा चपळ बाळ बापानें । - मोभीष्म ११ . ६९ . - वि .लहान ; अल्पवयी .मूर्ख . पंडित न गमसि जरि बहु पांडित्यहि करिसि दिससि बाळ मला । - मोकर्ण ४१ . १८ .अजाण . नुमजे बाळासि किमपि ... । - मोमौसल १ . १ . [ सं . बाल = मूल ; बाल + क = बालक ] म्ह० असतील बाळ तर फेडतील काळ .०आंबा पु. कच्चा किंवा हिरवा आंबा .०कडू डूं - न .लहान मुलांना किराईत वगैरे कित्येक कडू औषधें ( विशेषत : सकाळीं ) उगाळून पाजतात तें ; घुटी .( ल . ) लहानपणीं मिळालेलें शिक्षण किंवा वळण . बाळकडू असणें - उपजत प्रवृत्ति किंवा गुण असणें ; गोडी असणें . कोळ्याच्या मुलांना पोहोण्याचें बाळकडूच असतें . बाळका - पु . गोसाव्याचा शिष्य . [ बालक ]०क्रीडा स्त्री. लहानपणींचे लहान मुलांचे खेळ . [ सं . बालक्रीडा ]०खुंट पु. केळीच्या खुंटास नवीन फुटणारा कोंभ ; मोना .०गळा पु. लहान मुलाचा बारीक आवाज ; न फुटलेला आवाज .०गुंडा पु. बालगुंडा पहा .०गोपाळ पुअव .( कृष्णाचे खेळ - गडी , गवळ्यांचीं पोरें यावरुन ). लहान मुलें ; लहानमोठीं एकत्र जमलेलीं मुलें .एकत्र जमलेलीं गांवांतील लहानथोर माणसें . महाराज , हे सर्व बाळगोपाळ मिळाले आहेत . त्यांजवर आपण दया करावी . [ बाळ + गोपाल = गवळी ]०चरित त्र - न . लहानपणचें चरित्र ; बालक्रीडा . [ सं . ]०छंद पु. लहान मुलानें घेतलेला चाळा ; हट्ट . [ सं . ]०टोळ पु. लहान व हिरवा टोळ .०टोंक ढोंक - पु . बगळा .०ताड पु. नर जातीचा ताड . यास फळें येत नाहींत .०दशा स्त्री. बाल्य ; बाळपण ; बाल्यावस्था . लोपली उघडे बाळदशा । - ज्ञा ६ . २६० . [ सं . ]०दांत पुअव . लहानपणचे किंवा पहिले दांत ; दुधाचे दांत .०दृष्टि स्त्री. तारुण्यांतील बारीक व लांबची वस्तु जिनें दिसते अशी दृष्टि ; जोमदार दृष्टि . [ सं . ]०पणचें - न . पहिल्यानें व्यालेल्या गाईच्या किंवा म्हशीच्या दुधावरील लोणी .लोणी - न . पहिल्यानें व्यालेल्या गाईच्या किंवा म्हशीच्या दुधावरील लोणी .०परवेशी परवशी परवर्षी - स्त्री . बालपरवेशी पहा .०पाठ पु. लहानपणीं शिंकलेली विद्या ; लहानपणींची शिकवण . [ सं . ]०फूट न. बाळआंबा .रुपया इ० कांस असलेली बारीक चीर .०फोक पु. ( नाजुक किंवा कोंवळी फांदी यावरुन ) तरुण ; तरणाबांड ; आडबाप्या .०बद बोध - वि . बालबोध पहा .०बंद न. बाळबोध ; देवनागरी लिपी .०बोध - पु . ( ल . ) उदार धोरण . मी मुंबई इलाख्याचा कारभार चालवितांना ... एल्फिन्स्टन यांनीं घालून दिलेला बाळबोध कित्ता वळवीन . - टिले १ . ४३६ .कित्ता - पु . ( ल . ) उदार धोरण . मी मुंबई इलाख्याचा कारभार चालवितांना ... एल्फिन्स्टन यांनीं घालून दिलेला बाळबोध कित्ता वळवीन . - टिले १ . ४३६ .०बोध - न . साधी रीत ; जुनी , सनातनधर्माची रीत .वळण - न . साधी रीत ; जुनी , सनातनधर्माची रीत .०बुद्धि स्त्री. मुलाची बुद्धि . - वि . पोरकट समजुतीचा ; अज्ञानी ; पोरबुद्धि ; लेकुरबुद्धि .०बेल न. बेलाचें कोंवळें फळ .०ब्रह्मचारी भाषा मित्र - इ० बालमध्यें पहा .०भिकारी पु जन्मापासून भिकारी . याच्या उलट गर्भश्रीमंत .०भूक स्त्री. ( मुलाची भूक यावरुन ) वरचेवर , घटकेघटकेला लागणारी भूक .०भोंक न. बगळा ; बाळढोंक .( ल . ) लांब मानेचा इसम ; लांबमान्या .०भोग पु. प्रात : काळची पूजा झाल्यानंतर देवाला अर्पण केलेला उपहार .( यावरुन ल . ) लहान मुलांचा सकाळचा फराळ .अशा नैवेद्याचे किंवा फराळाचे पदार्थ . ( क्रि० देणें ; करणें ).( सामान्यत : ) हिस्सा ; वांटा ; भाग . ( क्रि० करणें ).०मति स्त्री. अज्ञान . रत्नें म्हणोनि भरि इंगळ जेंवि खोळे । घे काळ बाळमति पाहति लोक भोळे । - आपू २९ .०मायणी स्त्री. गाडीच्या चाकाच्या आंतील बाजूचा वसू ; आंतील वसवी ; कणा आखरींत भक्कम करण्याची लोखंडी चाकी ( माण ) बाळमाइनी०मुकी स्त्री. मेजवानीच्या किंवा फराळाच्या वेळीं गुपचूप वानगी म्हणून राखून ठेवलेला एखादा जिन्नस किंवा घास .असा राखून ठेवलेला नसेल त्यास दंड द्यावा लागणें किंवा दिलेला दंड . ( क्रि० लागणें ).०मुंज्या पु. लहानपणापासून मुंज्या ; मोठा झाला असला तरी अविवाहित किंवा ब्रह्मचारी असलेला मनुष्य .०रंडा रांड विधवा - स्त्री . बालरडा पहा .०राजा पु. पुंड , धीट किंवा दांडग्या मुलाला लाडिकपणें लावण्यांत येणारा शब्द . [ सं . ]०लेणें ल्याणें - न . लहान मुलाच्या अंगावर घालावयाचे बिंदली इ० दागिने . विषयांचें बाळलेणें । - शिशु ९२ .०वाटी स्त्री. सकाळचा अल्पोपहार , न्याहारी ; बाळभोग . ( क्रि० झोकणें ; चढविणें ; करणें ; खाणें ; होणें ).वाटा ; भाग ; हिस्सा .०वैद्य पु. लहान मुलांचा वैद्य .०शब्द पु. लहान मुलांसारखें बोलणें , आवाज , उच्चार . बाळशब्दें खेळवील तनुजाला ।०शिरें न. ( कों . ) बाळंतिणीला तिच्या मुलाकरितां धर्मार्थ दिलेलें दूध , भांडीं व इतर आवश्यक वस्तू इ० [ सं . बाल + क्षीर ]०सरस्वती स्त्री. बालसरस्वती पहा . सवत स्त्री . ( बायकी ) लहानपणापासूनची सवत . [ बाल + सं . सपत्नी ]०स्वार वि. लहानपणापासून घोड्यावर बसणारा .( ल . ) लहानपणापासून एखाद्या शास्त्रांत किंवा उद्योगधंद्यांत प्रवीण असलेला ; जन्माभ्यास असलेला . हिरडा , हरडा , डी , हर्तकी - पुस्त्री . बालहरीतकी ; कोवळा वाळविलेला हर्डा ; हें एक औषधी फळ आहे . चांभारी - हिरडा पहा . [ सं . बालहरीतकी ] बाळांबा - पु . बाळआंबा पहा . बाळाभ्यास , बाळाभ्यासी - बालाभ्यास , बालाभ्यासी पहा . बाळामराई - स्त्री . आंब्याच्या लहान झाडांची बाग . [ बाळ + आमराई ] बाळायती - वि . बाळ ; लहान . त्या बाळायती गोपीतें । हरिलें दैत्य वेषें तेथें । - रास २ . ३६० . बाळेभोंक - न . बाळभोंक ; बगळा . बाळेभोळे - वि . अज्ञ आणि भोळसर . माया दुस्तर शास्त्रप्रसिद्धी । तेथें बाळेभोळे स्थूळ बुद्धी । - एभा ३ . २२४ . बाळोपचार , बाळोपचारी - बालोपचार - री पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP