Dictionaries | References

बोभाणें

   
Script: Devanagari
See also:  बोभाइणें

बोभाणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To call loudly. Ex. ऊर्ध्व करूनिया हस्त ॥ दीर्घशब्दें बोभाती ॥.

बोभाणें

 उ.क्रि.  
   ( काव्य ) मोठ्यानें हांक मारणें ; बोलावणें .
   ओरडणें ; ओरड करणें ; हाकाहाक करणें . आपले परावे कोणी नेणें भोंवतीं । त्यांच्या नांवें बोभे बोभे हा हो श्रीपति । - तुगा १३१ . कृष्णातें पार्थातें कर्णहत समस्त वीर बोभाती । - मोकर्ण ३९ ३५ . [ बाहणें ] बोभा - स्त्री . ( काव्य ) हांक . तुका म्हणे झालों निराळा । आतां गोपाळा देऊं बोभा । - तुगा २०२ . बोभाट , टा - पु .
   प्रसिद्धि ; गवगवा ; बोलवा . ( गुप्त गोष्टीचा ).
   गर्जना ; घोष ; गजर . आंगेंसीं बोभाटु । सांडिती मेघ । - ज्ञा १८ . ७३४ .
   ओरड ; हाकाहाक ; हाकाटी . वाउगें बोभाट वर्माविण । - तुगा १४ .
   गार्‍हाणें ; कागाळी ; तक्रार . तुझे कथिति गोपिका विविध तीस बोभाट ते । - केका ८६
   गांवगुंडकी . [ बोभ + आट प्रत्यय ] म्ह० काम थोडें बोभाट मोठा . बोभटणें - अक्रि .
   वाजणें ; गर्जणें ; गाजणें . रुणझुणा वाजती नेपुरें । वांकी बोभाटती गजरें । - दा १ . २ . २३ .
   हांक मारणें ; बोलावणें ; ओरडणें . उंच स्वरें बोभाटत । - गुच १६ ६४ .
   बोभाटा होणें ; कुप्रसिद्धीस येणें ; बोलवा होणें . बोभावणें - अक्रि .
   ( काव्य ) घुबडानें , कोल्ह्यानें आवाज करणें , ओरडणें , घुमणें ; कोल्हेकुई करणें . बोभाइणें पहा . राजमंदिरीं अमंगळ । दिवाभीत बोभावती ।
   मोठ्यानें ओरडणें ; हांक मारणें . ते वेळीं महाविष्णूतें । बोभाविलें आकान्तीं । - मुआदि ६ . २२ . बोभाविणें - अक्रि . ( काव्य ) मोठ्यानें ओरडून हांक मारणें . बोभाणें पहा . एकमेकांतें बोभाविति ।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP