|
पु. भरती ; भरभराट ; चालता काल . ( भरणें ) पु. पंखांची भरारी , झपाटा ( उडणार्या पक्ष्यांचा ). ( क्रि० मारणें ; उडणें ; चालणें ). सणाणणारी गिरकी ( गोफणीची , हाताची ). ( क्रि० मारणें ). धांव ; जोरानें घुसणें ( शब्दशः व ल . ); जलद आणि जोराचा यत्न , व्यापार . घोड्यावर बसलों आणि भराक्यासरसाच पुण्यास दाखल झालों . देवाचा , पिशाचाचा झटका , झपाटा ; रागाचा , वार्याचा , झटकारा , सनाटा ; कामाचा , मारण्याचा , गाण्याचा धडाका इ० . घन , दाट वृष्टि ( दगड , बाण , भाले यांची ). झपाटा ; गिरकांडा ; झेंप ; धडका ; कोणतीहि आकस्मिक आणि वेगाची हालचाल . पिशाच संचरताच ह्या भराक्यासरसेंच विहिरींत उडी टाकली . अपानवायु सरणें ; पादणें . ( क्रि० सोडणें ; सारणें ). ( सामा . ) झपाटा . झपाटा पहा . [ ध्व . ] भराक्यासरसा उठणें - अक्रि . झपाट्याबरोबर उठणें . भराक्यासरसा येणें , जाणें , पडणें - अक्रि . भिरिरी , सणाण इ० आवाज करुन , सपाट्यानें किंवा वेगानें येणें , जाणें , पडणें . भराटणें - सक्रि . त्वरेनें करणें , भरकटणें ; झपाटणें ( एखादें काम ); खाऊन चट करणें ; झटकर फडशा पाडणें ( अन्नाचा ); घाईघाईनें कसेंबसें उरकणें , करणें . भराटा - पु . भर्र आवाज होईल असें उडणें ( पक्ष्यांचें ); इकडेतिकडे झटकणें ( हलका कचरा , जिन्नस ); गोंगाटाने वाहणें , चालणें ( वार्याचें ) आदळणें ( पावसाच्या सरीचें ); जलदीची , झपाट्याची , दणक्याची क्रिया . ( धांवणें , जाणें , बोलणें , खाणें इ० ) तांतड ; निकड ; झपाटा ( काम करावयाचा ); फडशा ( लिहिण्याचा , कामाचा ); गोंगाटाची , धडाक्याची हालचाल , क्रिया . ( क्रि० होणें ; चालणें ; लागणें उडणें ; करणें ; मांडणें ; चालविणें ; लाविणें ; उडविणें ). अत्यंत वैपुल्य ; समृद्धि . ( सुगीची , पिकाची ); पिकाचा , धान्याचा , आंब्याचा , अमदानीचा भराटा . - वि . प्रचुर ; विपुल ; जोराचा ; भक्कम . भराटा - पीक -- पाऊस - वारा . जलद केलेला व संपूर्ण फन्ना , फडशा ( अन्नाचा , आडकामांचा ). ( क्रि० उडणें ; होणें ; करुन टाकणें ; करणें ).
|