-
अ. १ निश्चय , खात्री , स्पष्टपणा , वैशिष्टय , स्वत : पण इ० दाखविणारें अव्यय . उदा० तुम्हीच या = इतरांस न पाठवितां तुम्ही स्वत : या ; तुम्ही याच = कसेंहि करून , न चुकतां या ; तो चोरच आहे = तो चोरीचाच धंदा करणारा आहे ; तोच चोर आहे = इतर कोणी नाहीं तो स्वत : चोर आहे . मी जेवतांच उठलों = जेवण होताक्षणीं उठलों ; मी येईनच = येईनच येईन ( खात्रीनें , नि : संशय मी येईन ). २ या अव्ययाला कधीं गुणदर्शक अर्थ असतो . उदा० तो पंडित बराच आहे = चालण्यासारखा ( उपयोगी पडेल असा ) आहे . ३ सदृश ; सारखा . पढलेला ग्रंथ बहुत दिवस न पाहिला असतां परका परकाच दिसूं लागतो . [ सं . चित ]
-
The sixth consonant.
-
सहावें व्यंजन . याचा उच्चार संस्कृतांत तालव्य होतो , पण मराठींत बहुधा दंततालव्य होतो , उदा० चमचा , चवरी . अक्षरविकास - तीन अवस्था - पहिली अशोककालीन , दुसरी इ . स . दुसर्या शतकांतील मथुरेच्या लेखांत व तिसरी ११ व्या शतकांतील उज्जयिनी लेखांत . कान्याविरहित ग सदृश आकृतीपासून आजचा विकास आहे .
-
ind An affix of emphasis or of enhancing power; expressing positiveness, peremptoriness, particularity, exactness, certainty &c. It corresponds with Very, self, indeed, surely &c.
Site Search
Input language: