-
स्त्री. १ प्रासंगिक उल्लेख ; वरवर उच्चारणें . ( क्रि० निघणें ). आज तुमची तेथें चर्चा निघाली होती . २ वार्ता ; बातमी . ३ ( देवादिकांच्या ) अवताराचें . महत्कृत्याचें , पराक्रमाचें , वर्णन , निरूपण , कथन . सर्वकाल भगवचर्चा करीत असावें . ४ एखाद्याच्या पाठीमागें केलेली निंदा . हे तुमचे तोंडावर गोड बोलतात पण मागें तुमची चर्चा करीत असतात . ५ चर्चन ; लेप देणें ; उटणें . ६ दोनहि पक्षांनीं आलटून पालटून किंवा एकापुढचें एक म्हणणें ( पद , चरण , श्लोक इ० ); गवयांनीं एकत्र गाणें . ७ ( ल . ) चढाओढ ; भांडण ; कलह ; वादविवाद ; उत्तरप्रत्युत्तर ; उहापोह ; वाटाघाट . अवसरीं उदारु । आत्मचर्चे चतुरु । एर्हवीं वेडा । - ज्ञा १३ . २११ . ८ विचार . [ सं . चर्च = चर्चा ]
-
ना. अनुबोध , उत्तर - प्रत्युत्तर , ऊहापोह , चर्वितचर्वण , प्रबोधन , बहुचर्चित , वाटाघाट , वादविवाद , विचारविनिमय , विचार - विमर्श ;
-
ना. प्रासंगिक बोलणे , विषय निघणे ;
-
ना. खलबत , बोलणी , मसलत .
Site Search
Input language: