|
न. वर्तुळ ; वलय ; घेर ; परिघ ; चक्र . चंद्र , सूर्य इ० चें बिंब . पं मंडळ आणि चंद्रमा । दोनी नव्हती सुवर्मा । - ज्ञा १४ . ४०५ . प्रांत ; क्षेत्र ; वास किंवा चाळीस योजनापर्यंतचा आसमंतांतील प्रदेश ; भोंवतालचा प्रांत . बारा चक्रवर्ती राजांनीं ज्या प्रांतावर राज्य केलें तो प्रांत , राष्ट्र . ( यावरुन ) प्रांत ; देश ; राज्य . जसें - कुरुमंडल . समुदाय ; समूह ; सभा ; समाज ; टोळी . वर्तुळाकार ठिपके असलेलें कोड . देवतेची स्थापना करण्यासाठीं काढलेली एक गूढ वर्तुळाकार आकृति . व्रतोद्यानप्रसंगीं देवतांची स्थापना करण्यासाठीं विशिष्ट रंगानें रंगविलेलीं सर्वतोभद्र , लिंगतोभद्र इं० मडळें प्रत्येकीं . एक निरुपद्रवी सर्प . देवास नैवेद्य दाखवितांना पात्राखालीं पाण्याची ( चौकोनी , वर्तुळाकार , त्रिकोणी इ० ) काढलेली आकृति . सैन्याची वर्तुळाकार रचना . चुन्याच्या घाणीची वर्तुळाकार चाकोरी . बेचाळीस दिवसांचा काल . त्यासि एक मंडळ सांग । पठणें करुनि कार्यसिद्धी । - व्यं ९४ . ( समासांत ) शरीराचा तो तो भाग . जसें - मस्तक - कुच - कर्ण - मंडल . तेआं नाभिमंडळा आगाधा । समवेत ब्रह्में पेलिलें दोंदा । - ऋ ९० . ( कु . ) समुद्राच्या तळाशीं असलेले खडक . राजमंडल . [ सं . मंडल ] ०फिरणें वर्तुळाकार , गोल फिरणें . मंडळावर धरणें मंडलाकार , बाटोळें फिरविणें ( घोडा इ . स . ). ०गति बाहु )- पु . ( नृत्य . ) बाहू वर्तुळाकार फिरविणें . ( बाहु )- पु . ( नृत्य . ) बाहू वर्तुळाकार फिरविणें . ०देवता स्त्री. अव . एखाद्या व्रताच्या आरंभीं सर्वतोभद्र , लिंगतोभद्र इत्यादि मंडलांवर पूजिल्या जाणार्या देवता . ( ल . ) राजाच्या बरोबरचे सरदार , प्रधान . राजसभा ; दरबार . कोणत्याहि सरदाराचा , थोरमाणसाचा लवाजमा . ०वत क्रिवि . वर्तुळाप्रमाणें ; वाटोळा ; चक्राकार . वत न . अनेक पानें चोयांनीं टोंचून जेवणासाठीं केलेलें जेवणाचें पान ; पत्रावळ . [ मंडळ + पत्र ] ०स्वस्तिक - न . ( नृत्य ) ऐंद्र स्थानांत उभें राहणें व हातांचें स्वस्तिक करणें व आपल्या समोर बसलेल्या मनुष्याला अभिमुख दिसतील असे तळहात वर ठेवणें . मंडली , ळी - स्त्री . करण - न . ( नृत्य ) ऐंद्र स्थानांत उभें राहणें व हातांचें स्वस्तिक करणें व आपल्या समोर बसलेल्या मनुष्याला अभिमुख दिसतील असे तळहात वर ठेवणें . मंडली , ळी - स्त्री . मनुष्यांचा जमाव , समुदाय , संघ . ( कायदा ) एकमेकांशीं भागीदारी असणार्या माणसांचा समुदाय , मंडळ . ( इं . ) फर्म . स्पर्श केल्याबरोबर वेटोळें करुन बसणारा अनेक पायांचा एक किडा , वाणी . ( ख्रि . ) सार्वत्रिक मंडळी ; पिता , पुत्र व पवित्र आत्मा असा जो सनातन एकच देव त्याजवर भाव ठेवून स्वतःस ख्रिस्ती म्हणविणार्या पृथ्वीवरील सर्व लोकांचा संघ . ( इं ) एक्लेशिया . आणखी मी तुला सांगतों कीं , तूं पेत्र ( खडक ) आणि या खडकावर मीं आपली मंडळी रचीन . - मत्त १६ . १८ . ( ख्रि . ) स्थानिक मंडळी ; ईश्वरोपासना , शुद्धाचरण व खिस्ताच्या राज्याचा विस्तार हे हेतू पुढें ठेवून विधिपूर्वक स्थापित झालेला व सार्वजनिक उपासनेसाठीं नियमितपणें एकत्र जमत असलेला खिस्ती लोकांचा संघ . ( इं . ) कॉंग्रिगेशन . ( गहूं , बाजरी , भात इ० ) पिकाच्या पेंढ्यांची वर्तुळाकार गंजी . पति किंवा पत्नी परस्परांविषयीं बोलतांना योजितात . मंडली , मंडळीक - पु . मंडळ , थवा , पथक इ० चा नायक . मांडलिक . उखरडा धाधाविलें । मंडळीकु निघालें । - शिशु ५०४ . मंडलेश्वर - पु . सार्वभौम राजा . मांडलिक राजा . [ मंडल + ईश्वर ]
|