|
पु. हिरा ; माणिक ; रत्न ; माळेंत ओंवण्याचा गोलक , गोळी . मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित । - तुगा १ . दगड , लाकूड इ० कातून घडून तयार करतात ती गोलवस्तु . शिश्नाची बोंडी . योनिलिंग ; दाणा ( ल . ) कोणत्याहि गुणानें श्रेष्ठ , ललामभूत मनुष्य . ज्याच्या भोंकातून दोरी ओंवून एखादी जड वस्तु वर उचलतात , खेंचतात किंवा भारा , ओझें इत्यादि आवळतात ती लाकडाची कप्पी ; ( इं . ) पुली . निकणांतून पाखडून निघालेले पोंचट दाणे मदन पहा . सापाच्या किंवा हत्तीच्या डोक्यांतील एक रत्न . क्रोधें चवताळतो ज्यापरी जातिवत जो फणी । त्तयाचा कोणी हरितां मणी । - विक ३२ . पुरुषाचें रेत . लोखंडाच्या पत्र्यास भोंक पाडण्याकरितां त्याच्याखालीं ठेवतात तो छिद्रयुक्त ठोकळा . [ सं . मणि ] म्ह० सुतासाठीं मणि फोडणें - अत्यंत अल्प लाभासाठी फार मोठी हानि करुन घेणें . एका माळेचे मणी - ( जपाच्या माळेंतील मणी सारखेच असावे लागतात यावरुन ल . ) एकसारखे वाईट , दुर्वर्तनी . ०कंठ पु. पक्षिविशेष ; तास ; चाष . ०कर्णिका स्त्री. काशी येथील एक तीर्थ . एक विशिष्ट आकाराची पाणी पिण्याची लोटी , तपेली . [ सं . ] ०कार पु. जवाहिरी ; जव्हेरी ; मण्यार . [ सं . ] ०घोळणी स्त्री. मणी तयार करण्याचें सोनाराचें एक उपकरण . ०ज वि. अंड्यापासून उत्पन्न झालेला ( पक्षी इ० ); अंडज . परि आधीं तंव स्वेदज । जारज उद्भिज मणिज । - ज्ञा १५ . १४८ . [ सं . ] ०नीभ वि. सर्व शरीराचा रंग गौरवर्ण व फक्त टाळूच्या ठिकाणीं तांबडा असा ( घोडा )- अश्वप १ . २२ . ०पुर पूर - न . ( योग ) नाभिस्थानाजवळील एक चक्र . या ठिकाणीं डं पासून फं पर्यंत अक्षरें असून , मोक्षदायी म्हणून या चक्राचें चिंतन करतात . नाभिस्थानीं मणिपुर कमळ । - विउ १ . ५० . मणिपूरेंसीं झुंजे । राहोनियां । - ज्ञा ६ . २१५ . ०बंध पु. मणगट . एक वृत्त . याच्या चरणांत नऊ अक्षरें व भ , म , स हे गण असतात . उदा० द्रव्य मिळावें याकरितां । कां हलक्यांना आर्जवितां । काय नव्हे हो तो धनवान । ईश रमेचा जो भगवान । [ सं . ] ०भूमिकाकर्म न. ६४ कलापैकीं एक कला ; त्रिकोण , चतुष्कोन इ० आकृतींत जमिनीवर मण्यांची रचना करणें . [ सं . ] ०भूषण न. रत्नांचा अलंकार . अष्टादशपुराणें । तींचि मणिभूषणें । - ज्ञा १ . ५ . [ सं . ] ०मंगळसूत्र न. मुहूर्तमणि व मंगळसूत्र . स्त्रियांचा मणि व मंगळसूत्र एकत्र ओवलेला एक अलंकार . मणखुरा - पु . सोनाराची मणि इ० करण्याची ऐरण . [ मणि + खुरा ] मणदोरा - पु गाडीवरचें ओझें बांधावयाची दोरी व ज्याच्या भोंकातून दोरी ओवून खेचतात तो मणी , ठोकळा समुच्चयानें . नदी ओलांडणारी नाव इकडेतिकडे वाहवत जाऊं नये म्हणून नदीच्या दोन्ही काठांवर पुरलेल्या दोन खांबांना बांधलेली दोरी व तिच्यावरुन सरकणारा लाकडी मणी , ठोकळा . पिशवी , बटवा इ० चें तोंड उघडावयाची किंवा बंद करावावयाची दोरी ; धांवता दोरा ; ओढदोरा . लोंबत सोडलेला पडदा ज्या दोरीवरुन सरकविला जातो ती दोरी . स्त्रिया कंबरेला बांधतात तो अभिमंत्रित दोरा . वस्त्राच्या शेवटीं किंवा ताग्याच्या शेवटीं जे आडवे जाड धागे ठासलेले असतात ते समुच्चयानें . [ मणि + दोरा ] मणेर , मण्यार - पु . एक विषारी सापाची जात . मणेर , री , मण्यार - पु . एक जात किंवा तींतील व्यक्ति . हे लोक बांगड्या , मणी , कांकणें तयार करतात व विकतात . स्टेशनरी सामान विकणारा दुकानदार . जवाहिर्या ; सराफ . मणेरी , मण्यारी - वि . मण्यार लोकांसंबंधीं . स्टेशनरी सामानासंबंधीं . - मुंव्या ११ .
|